शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

पर्रीकरांच्या बैठकीला जाण्यास माजी मंत्री डिसोझा अनुत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2018 13:14 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सर्व भाजपा आमदार व भाजपाच्या मंत्र्यांना शनिवारी सायंकाळी बैठकीसाठी बोलावलेले असले तरी, ज्येष्ठ आमदार असलेले भाजपाचे माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा हे मात्र या बैठकीला जाण्यासाठी उत्सुक नाहीत. 

ठळक मुद्देमुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सर्व भाजपा आमदार व भाजपाच्या मंत्र्यांना शनिवारी सायंकाळी बैठकीसाठी बोलावले आहे.ज्येष्ठ आमदार असलेले भाजपाचे माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा हे मात्र या बैठकीला जाण्यासाठी उत्सुक नाहीत. डिसोझा याना अलिकडेच पर्रीकर यांनी मंत्रिमंडळातून डच्चू दिलेला आहे.

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सर्व भाजपा आमदार व भाजपाच्या मंत्र्यांना शनिवारी सायंकाळी बैठकीसाठी बोलावले असले तरी, ज्येष्ठ आमदार असलेले भाजपाचे माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा हे मात्र या बैठकीला जाण्यासाठी उत्सुक नाहीत. 

डिसोझा याना अलिकडेच पर्रीकर यांनी मंत्रिमंडळातून डच्चू दिलेला आहे. डिसोझा हे अमेरिकेतील रुग्णालयात उपचार घेत होते व त्यावेळीच त्याना मंत्रिमंडळातून डच्चू दिला गेला. भाजपाच्या श्रेष्ठींनी केलेल्या सूचनेनुसार आपण तुम्हाला मंत्रिमंडळातून वगळत असल्याचे पर्रीकर यांनी डिसोझा याना त्यावेळी सांगितले होते. स्वत: पर्रीकरही त्यावेळी रुग्णालयात होते. मात्र आपल्याला डच्चू देण्याचा निर्णय भाजपाच्या श्रेष्ठींचा नव्हे तर गोवा भाजपाच्या कोअर टीमचा व पर्रीकर यांचाच आहे अशी डिसोझा यांची भावना झाली. त्यावेळपासून ते खूप दुखावले व नंतर त्यांचा कधी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याशी संवाद झाला नाही.

पर्रीकर हे आजारी असून ते आपल्या खासगी निवासस्थानीच असतात. मात्र भाजपाचे काही आमदार व सरकारमधील काही बिगरभाजपा मंत्रीही अलिकडे प्रशासन ठप्प झाल्याची टीका जाहीरपणे करू लागल्यानंतर पर्रीकर यांनी आमदारांची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला. शनिवारी सायंकाळी प्रथमच त्यांच्या निवासस्थानी भाजपा आमदार एकत्र येतील. पर्रीकर यांनी बैठकीचा अजेंडा आम्हाला सांगितलेला नाही पण आम्ही बैठकीला जाणार असे दोन आमदारांनी लोकमतला सांगितले. ज्येष्ठ आमदार डिसोझा यांनी मात्र आपण कदाचित बैठकीला जाऊ शकणार नाही असे सांगितले. आपल्यालाही बोलविले गेले आहे पण आपण रुग्णालयातून आल्यानंतर घरीच आहे. आपण अजून एकही दिवस घराबाहेर पडलेलो नाही. त्यामुळे पर्रीकर यांनी बोलविलेल्या बैठकीस जावे असे वाटत नाही. शेवटी त्या बैठकांमध्येही काही ठरत नसते, असे डिसोझा म्हणाले. 

दरम्यान, आरोग्य मंत्री विश्वजित राणे हे गोव्याबाहेर आहेत. त्यामुळे तेही बैठकीला पोहचणार नाहीत. आपण पोहचू शकणार नसल्याची कल्पना त्यांनी मुख्यमंत्री पर्रीकर यांना दिलेली आहे.

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाManohar Parrikarमनोहर पर्रीकरPoliticsराजकारण