विदेशी युवतीचा खून

By Admin | Updated: March 15, 2017 01:33 IST2017-03-15T01:29:12+5:302017-03-15T01:33:31+5:30

काणकोण : खटखटे-देवबाग येथे मंगळवार, दि. १४ रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास एका विदेशी युवतीचा मृतदेह आढळला

Foreign maiden's blood | विदेशी युवतीचा खून

विदेशी युवतीचा खून

काणकोण : खटखटे-देवबाग येथे मंगळवार, दि. १४ रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास एका विदेशी युवतीचा मृतदेह आढळला. आयर्लंड देशाची नागरिक असलेल्या या युवतीवर बलात्कार करून तिचा खून केल्याचा संशय आहे. पोलिसांनी काणकोणमधील सहा युवकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. त्याचप्रमाणे या विदेशी युवतीची सखोल माहिती मिळविण्याकरिता विदेशी पर्यटकांचीही चौकशी केली आहे. या घटनेमुळे काही वर्षांपूर्वी उत्तर गोव्यात रशियन युवती स्कार्लेट किलिंग हिच्या खून प्रकरणाच्या स्मृती ताज्या झाल्या.
खटखटे येथून आपल्या शेतात जाणाऱ्या प्रशांत कोमरपंत यांनी ही माहिती काणकोण पोलिसांना दिल्याचे दक्षिण गोव्याचे पोलीस उपअधीक्षक सॅमी तावारिस यांनी सांगितले. मृत युवतीचे नाव डॅनियल मेक्लुन (२६) असे असून ती आयर्लंडची नागरिक आहे. या युवतीचा मृतदेह सापडला, तेव्हा तिच्या अंगावर कपडे नव्हते. त्यामुळे तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. काणकोण पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगावच्या हॉस्पिसिओ इस्पितळात पाठवला आहे.
काणकोणात मोठ्या प्रमाणात जंगल पार्ट्या होतात. आगोंद येथे होळीनिमित्त आयोजित पार्टीला ही युवती जात होती का, याबाबत पोलिसांचा तपास चालू आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Foreign maiden's blood