शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गोवा - दाबोळी विमानतळावर ४३ लाख ७० हजार रूपयाचे परकीय चलन जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 19:21 IST

गोवा - दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमा शुल्क संचालनालयाच्या हवाई गुप्तहेर विभागाच्या अधिकाºयांच्या सतर्कतेमुळे संशयास्पद हालचालीवरून दोन प्रवाशांना ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे ४३ लाख ७० हजार रूपये किंमतीचे परकीय चलन जप्त करण्यात यश मिळविले.

वास्को : गोवा - दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमा शुल्क संचालनालयाच्या हवाई गुप्तहेर विभागाच्या अधिकाºयांच्या सतर्कतेमुळे संशयास्पद हालचालीवरून दोन प्रवाशांना ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे ४३ लाख ७० हजार रूपये किंमतीचे परकीय चलन जप्त करण्यात यश मिळविले.सीमा शुल्क संचालनालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी मुरगाव हार्बर येथील आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन या कारवाईची माहिती दिली. एक आंतरराष्ट्रीय आणि एक देशी प्रवाशी दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ओमन एअरव्हेज विमानाने दुबईला जाण्यासाठी आले होते. या विमान तळावरून सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याने या विमानतळावरील सीमा शुल्क संचालनालयाचे हवाई गुप्तहेर अधिकारी सतर्कता बाळगून होते़ या विभागाचे सहाय्यक आयुक्त जी़बी़ सांतीमानो यांच्या मार्गदर्शनाखाली हवाई गुप्तहेर प्रवाशांच्या हालचालीवर नजर ठेऊन होते. त्यांना कक्षामध्ये सदर दोन प्रवाशांच्या हालचाली संशयास्पद दिसल्यामुळे या अधिकाºयानी या दोन्ही प्रवाशाना अडविले आणि त्याच्या जवळ असलेल्या बॅगेची झडती घेतली असता या दोन्ही प्रवाशांकडे सुमारे ४३ लाख ७० हजार रूपयांचे परकीय चलन सापडले. विमानात चढण्यापुर्वी या प्रवाशाच्या सामानाची तपासणी झाली होती. या दोन्ही प्रवाशांना ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानी हे परकीय चलन दुबईला तस्करीमार्गाने नेत असल्याची कबुली दिली. सीमा शुल्क अधिकाºयानी सदर चलन कस्टम कायदा आणि फे मा कायद्याखचाली जप्त केलेले आहे. सीमा शुल्क संचालनालयाचे आयुक्त आऱ मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर संपूर्ण कारवाई करण्यात आली असून त्याची पुढील चौकशी चालु आहे.

टॅग्स :crimeगुन्हेgoaगोवा