‘फोर्स’चे आंदोलन यशस्वी
By Admin | Updated: August 4, 2015 02:35 IST2015-08-04T02:35:04+5:302015-08-04T02:35:17+5:30
पणजी : सत्ताधारी पक्षाच्या मंत्री आणि आमदारांनी दिलेल्या लेखी हमीनंतर सोमवारी सायंकाळी ४ वाजता ‘फोर्स’ संघटनेने आपले आंदोलन मागे घेतले.

‘फोर्स’चे आंदोलन यशस्वी
४ येत्या अधिवेशनात विधेयक ४ इंग्रजी शाळांबाबत आमदारांकडून लेखी हमी
पणजी : सत्ताधारी पक्षाच्या मंत्री आणि आमदारांनी दिलेल्या लेखी हमीनंतर सोमवारी सायंकाळी ४ वाजता ‘फोर्स’ संघटनेने आपले आंदोलन मागे घेतले. येत्या विधानसभा अधिवेशनात ‘फोर्स’ची मागणी मान्य केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन या पत्रात देण्यात आले आहे.
राज्यात चर्चशी संबंधित डायोसेझन संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना अनुदान सुरू ठेवले जावे, या मागणीसाठी आंदोलन सुरू झाले होते व त्यासाठी विधानसभेत विधेयक आणून ते संमत करावे, (पान २ वर)