पाच दिवसांची मुदत

By Admin | Updated: April 18, 2015 02:37 IST2015-04-18T02:37:24+5:302015-04-18T02:37:53+5:30

मडगाव : माजी मंत्री मिकी पाशेको यांना शोधून काढण्यासाठी कोलवा पोलिसांनी केलेले प्रयत्न पुरेसे नसल्याचे स्पष्ट शब्दांत नमूद करून मडगावच्या

Five day deadline | पाच दिवसांची मुदत

पाच दिवसांची मुदत

मडगाव : माजी मंत्री मिकी पाशेको यांना शोधून काढण्यासाठी कोलवा पोलिसांनी केलेले प्रयत्न पुरेसे नसल्याचे स्पष्ट शब्दांत नमूद करून मडगावच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पूजा कवळेकर यांनी पाशेकोंच्या विरोधात जारी केलेल्या अटक वॉरन्टची मुदत आणखी पाच
दिवसांनी वाढवली. दरम्यानच्या काळात पाशेको यांना शोधून काढण्यासाठी कसून प्रयत्न करा, असा सल्लाही त्यांनी पोलिसांना दिला. दरम्यान, पोलिसांनी पाशेकोंना जाणूनबुजून अटक केली नाही, असा
दावा करून अ‍ॅड. आयरिश रॉड्रिगीस यांनी ‘पोलिसांकडून कोर्टाच्या आदेशाचा अवमान झाला,’ अशा आशयाचा जो अर्ज केला, त्यावर न्या. कवळेकर शनिवार १८ एप्रिल रोजी आदेश देणार आहेत.
पाशेको यांचा कसून शोध घेऊनही गेल्या
सात दिवसांत ते सापडले नाहीत. त्यामुळे त्यांना
फरार घोषित करावे, असा अर्ज कोलवा
पोलिसांनी केला होता. (पान २ वर)

Web Title: Five day deadline