पाच कंपन्यांना खाणी आंदण

By Admin | Updated: July 17, 2015 03:34 IST2015-07-17T03:34:35+5:302015-07-17T03:34:51+5:30

येत्या सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये खाणी सुरू होतील तेव्हा सेसा गोवा, फोमेन्तो, तिंबले, चौगुले व साळगावकर याच पाच उद्योग समूहांकडून बहुतांश खनिज उत्खनन केले जाणार आहे

Five companies mine mine | पाच कंपन्यांना खाणी आंदण

पाच कंपन्यांना खाणी आंदण

 सद््गुरू पाटील ल्ल पणजी
येत्या सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये खाणी सुरू होतील तेव्हा सेसा गोवा, फोमेन्तो, तिंबले, चौगुले व साळगावकर याच पाच उद्योग समूहांकडून बहुतांश खनिज उत्खनन केले जाणार आहे. सरकारच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने जल व हवा कायद्यांतर्गत मान्यता देताना खाण खात्याच्या साहाय्याने खाण कंपन्यांना जी वार्षिक खनिज उत्खनन मर्यादा निश्चित केली, त्यात प्रामुख्याने पाच कंपन्यांच्याच सर्वाधिक खाणी आहेत.
१ ते ७ अशा क्लस्टरमध्ये ३५ खाणींचा समावेश आहे. या ३५ खाणींना निश्चित केलेली वार्षिक खनिज उत्खनन मर्यादांची कागदोपत्री माहिती ‘लोकमत’ला उपलब्ध झाली. या ३५ खाणींसह आणखी २३ खनिज खाणींना प्रदूषण नियंत्रण मंडळाने जल व हवा प्रदूषण कायद्यांतर्गत मान्यता दिली आहे. त्या खाणीही पुढील काही महिन्यांत सुरू होतील. सेसा गोवा व फोमेन्तो यांच्याकडून काही अन्य कंपन्यांच्या खनिज खाणी चालविण्यासाठी घेतल्या आहेत़
(३५ खाणींची उत्खनन मर्यादा पान २ वर)

Web Title: Five companies mine mine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.