गोव्यात उद्या मध्यरात्री मासेमारीबंदी उठणार; समुद्रात जाता येणार

By किशोर कुबल | Published: July 30, 2023 12:37 PM2023-07-30T12:37:27+5:302023-07-30T12:39:27+5:30

मासे विक्रीसाठी असलेल्या शेडची डागडुजी चालू होती. मासळी ठेवण्यासाठीचे क्रेटस आणले जात होते.

Fishing ban will be lifted tomorrow midnight in Goa | गोव्यात उद्या मध्यरात्री मासेमारीबंदी उठणार; समुद्रात जाता येणार

गोव्यात उद्या मध्यरात्री मासेमारीबंदी उठणार; समुद्रात जाता येणार

googlenewsNext

किशोर कुबल / पणजी

पणजी : गोव्यात मासेमारीवरील ६१ दिवसांची बंदी उद्या सोमवारी मध्यरात्री १२ वाजता उठणार असून ट्रॅालर्स मासेमारीकरिता समुद्रात जाण्यास मोकळे होतील. उद्यापासून गोवेकरांच्या ताटात ताजी-ताजी मासळी येईल. मालिम जेटीला भेट दिली असता तेथे लगबग दिसून आली. ट्रॉलर्सवर पाणी भरण्याचे तसेच इतर कामे चालू होती. मासे विक्रीसाठी असलेल्या शेडची डागडुजी चालू होती. मासळी ठेवण्यासाठीचे क्रेटस आणले जात होते.

राज्यात १ जूनपासून ६१ दिवस मासेमारीवर बंदी असते. हा काळ मासळीसाठी प्रजनन काळ असल्याने मच्छिमारीवर बंदी असते. राज्यात मालिम, कुटबण, बेतुल, वास्को, शापोरा या प्रमुख जेटी आहेत. सुमारे ३० टक्के ट्रालर्सवरील खलाशी अद्याप परतलेले नाहीत त्यामुळे या ट्रॉलरमालकांसमोर पेच निर्माण झालेला आहे. मोठ्या ट्रॉलरवर सुमारे २५ ते ३० तर लहान ट्रॉलरवर १५ ते २० खलाशी लागतात. ओडीशा, झारखंड, कर्नाटकातून खलाशी येतात . काही  ट्रॉलर्सवरील खलाशी अजून परतलेले नाहीत.

Web Title: Fishing ban will be lifted tomorrow midnight in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.