गोव्यात येणारी मासळी फॉर्मेलिन असलेलीच, आपचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 11:05 PM2019-08-29T23:05:36+5:302019-08-29T23:06:15+5:30

परराज्यातून गोव्यात येणा-या मासळीत फॉर्मेलिन हे घातक द्रव्य असल्याचे एफडीएच्या चाचणीत मागच्या जून महिन्यात सिद्ध झाल्यानंतर गोव्यात मोठा गदारोळ माजला होता.

The fish in Goa is a formalin, AAP allegation | गोव्यात येणारी मासळी फॉर्मेलिन असलेलीच, आपचा आरोप

गोव्यात येणारी मासळी फॉर्मेलिन असलेलीच, आपचा आरोप

Next

मडगाव - परराज्यातून गोव्यात येणा-या मासळीत फॉर्मेलिन हे घातक द्रव्य असल्याचे एफडीएच्या चाचणीत मागच्या जून महिन्यात सिद्ध झाल्यानंतर गोव्यात मोठा गदारोळ माजला होता. त्यानंतर गोव्यात येणारी मासळी खाण्यासाठी योग्य असल्याचा दावा सरकारने केल्यानंतर गोव्यातील जनतेने सुटकेचा श्र्वास सोडला होता. मात्र गोव्यात येणा:या मासळीमध्ये अजुनही फॉर्मेलिन सापडते असा दावा आम आदमी पक्षाने केला असून त्या पृष्ठर्थ चाचणीचे व्हिडिओही व्हायरल केल्याने पुन्हा एकदा गोव्यात गदारोळ माजण्याची शक्यता आहे.

गोव्यातील मासळी फॉर्मेलिन मुक्त असा दावा गोवा सरकार करत असले तरी बाजारात येणारी मासळी फॉर्मेलिनचीच असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला असून आपल्या आरोपाच्या पृष्ठर्थ मडगाव, कोलवा, लोटली व केपे या बाजारातून खरेदी केलेल्या माशांचा फॉर्मेलिन चाचणीनंतर रंग बदलतो असा दावा करणारे व्हिडिओही व्हायरल केले आहेत.

गुरुवारी आपचे दक्षिण गोवा प्रवक्ते सिद्धार्थ कारापूरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी आणि गोवेकरांच्या मनातील भीती दूर करावी अशी मागणी केली. यावेळी त्यांच्याबरोबर रिचर्ड डिसा, रामीरो मास्कारेन्हस तसेच पेट्रीसिया फर्नाडिस हे उपस्थित होते.

मागच्या वर्षी जुन महिन्यात मासळीत फॉर्मेलीन सापडल्याचे वृत्त पसरल्यानंतर संपूर्ण गोव्यातील लोक हादरुन गेले होते. त्याचा परिणाम गोव्याच्या पर्यटनावरही झाला होता. त्यानंतर हे प्रकरण अगदी न्यायालयार्पयत पोहोचले होते. मात्र यावर्षी लोक हा विषय विसरले होते. अशातच आता आपने हा आरोप केल्याने पुन्हा एकदा लोकामध्ये भीती निर्माण होण्याची शक्यता आहे.

आपचे कारापूरकर म्हणाले, आपच्या कार्यकत्र्यानी मडगाव होलसेल मार्केट तसेच कोलवा, लोटली व केपे या मार्केटातून पॉपलेट व लेपा विकत घेऊन फिश टेस्ट किटद्वारा त्या माशांची तपासणी केली असता माशांवर ठेवलेल्या कागदाचा रंग निळा झाल्याचे दिसून आले. या किटप्रमाणो माशांवर ठेवलेल्या किटमधील कागदाचा रंग निळा झाल्यास त्यात फॉर्मेलिन आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे गोव्यात येणा:या माशात फॉर्मेलिन असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे हे मासे खाण्यालायक आहेत की नाहीत हे सरकारने स्पष्ट करावे आणि लोकांच्या मनातील संभ्रम दूर करावा.

गोव्यात येणारे मासे गोव्याच्या सीमेवर तपासले जातात असा दावा सरकार करते मात्र गोव्यात मोठय़ा प्रमाणावर रेल्वेतूनही मासे येतात त्याचे काय असा सवाल त्यांनी केला. गोव्यात येणा:या माशांची आणि इतर वस्तूंची तपासणी करण्यासाठी सुसज्ज अशी प्रयोगशाळा स्थापन करणार असे आश्र्वासन सरकारने दिले होते त्याचे काय झाले असा सवालही त्यांनी केला. यापूर्वी एफडीएच्या आयवा फर्नाडिस यांनी केलेल्या तपासणीत गोव्यात येणा:या माशात फॉर्मेलिन असल्याचे सिद्ध झाले होते. आपली जबाबदारी प्रामाणिकपणो पार पाडणा:या या महिला अधिका:याची नंतर मडगावातून बदली केली गेली याचाही उल्लेख कारापूरकर यांनी यावेळी केला.

Web Title: The fish in Goa is a formalin, AAP allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :AAPgoaआपगोवा