नियोजित मोपा विमानतळावरुन पहिले उड्डाण 2019 साली : मुख्यमंत्री
By Admin | Updated: October 24, 2016 20:20 IST2016-10-24T20:20:52+5:302016-10-24T20:20:52+5:30
मोपा येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन पहिले विमान 2019 साली उड्डाण करील, असा दावा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केला.

नियोजित मोपा विमानतळावरुन पहिले उड्डाण 2019 साली : मुख्यमंत्री
ऑनलाइन लोकमत
पणजी : मोपा येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन पहिले विमान 2019 साली उड्डाण करील, असा दावा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केला. या विमानतळासाठी जमीन गमावलेल्या ज्या कुटुंबांच्या दस्ताऐवजांविषयी स्पष्टता नाही त्यांना मोफत कायदा सल्ला व इतर मदत मिळवून देण्यासाठी निवृत्त उपजिल्हाधिका-याची सहा महिन्यांसाठी नियुक्ती केली जाईल.
350 ते 400 झळग्रस्त कुटुंबांना सोमवारी मुख्यमंत्र्यांहस्ते सुधारित नुकसान भरपाई वितरित करण्यात आली. सुमारे 31 कोटी रुपयांचे वितरण झाले.
भूसंपादन अधिका-यांनी दिलेल्या अहवालानुसार याआधी या कुटुंबांना भरपाई दिली होती परंतु ती अत्यल्प होती आता तीनपट जास्त भरपाई देण्यात आली आहे. मोपा, चांदेल, हणखणे, कासारवर्णे, उगवें गावातील झळग्रस्तांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले.
नियोजित ग्रीन फिल्ड विमानतळासाठी मोपा येथे 1 लाख चौरस मिटरहून अधिक जमीन संपादित करण्यात आलेली आहे.