शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
5
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
6
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
7
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
8
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
9
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
10
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
11
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
12
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
13
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
14
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
15
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
16
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
17
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
18
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
19
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले

द फर्स्ट डेथ ऑफ जोआना : ती ७० वर्षे कुमारी म्हणून का जगली आणि कुमारी म्हणूनच का मरण पावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 18:33 IST

ज्या महिलेने आयुष्यात कोणाशीही प्रेमसंबंध जोडण्याचा प्रयत्न केला नाही आणि ७० व्या वर्षीच कुमारी म्हणून मरण पावली अशा महिलेच्या गूढ आयुष्याचा शोध घेण्याचा प्रयत्न 'द फर्स्ट डेथ ऑफ जोना ' / ए प्राइमिरिया मॉर्टे डी जोआना या सिनेमातून घेतला आहे.

- संदीप आडनाईकपणजी  - ज्या महिलेने आयुष्यात कोणाशीही प्रेमसंबंध जोडण्याचा प्रयत्न केला नाही आणि ७० व्या वर्षीच कुमारी म्हणून मरण पावली अशा महिलेच्या गूढ आयुष्याचा शोध घेण्याचा प्रयत्न 'द फर्स्ट डेथ ऑफ जोना ' / ए प्राइमिरिया मॉर्टे डी जोआना या सिनेमातून घेतला आहे. पोर्तुगीज दिग्दर्शक क्रिस्टियान ऑलिव्हिरा यांचा 'द फर्स्ट डेथ ऑफ जोना ' ए प्राइमिरिया मॉर्टे डी जोआना या चित्रपटाचा गोवा येथे सुरु असलेल्या ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वर्ल्ड प्रीमियर झाला.ओलिव्हिरा म्हणाल्या: ह्लमाझा चित्रपट एका स्त्री कलाकाराच्या खर्‍या कथेवर आधारित आहे जिने स्वत: च्या अटीवर आपले जीवन व्यतीत केले आणि कोणाबरोबरही प्रेमसंबंध न ठेवता तिचा मृत्यू झाला. ती माझ्या अगदी जवळची होती तरीही तिचे आयुष्य माझ्यासाठी कायम गूढ राहिले. म्हणूनच मी तिच्या भूतकाळाचा आणखी शोध घ्यायला सुरवात केली. आणि अशा प्रकारे, सिनेमाचा जन्म झाला. ह्वहा चित्रपट बनवताना, तिने आणि सह-लेखिका सिल्व्हिया लोरेन्को यांनी त्यांचे वैयक्तिक अनुभव या महिलेच्या वास्तविक जीवनातील अनुभवांबरोबर जोडले आहेत ज्याने त्यांना प्रेरणा दिली अशी ऑलिव्हिरा यांनी माहिती दिली .महोत्सवाच्या जागतिक पॅनोरामा विभागात हा चित्रपट सादर करण्यात आला आहे. चित्रपटातील घटनांचा काळ २००७ असला तरी त्याचे चित्रीकरण २०२१ मध्ये दक्षिण ब्राझीलमधील नयनरम्य ठिकाणी केले गेले. कथानक त्या ठिकाणाशी घनिष्ठपणे जोडलेले आहे म्हणून तिने ही जागा निवडली. ह्लपवन ऊर्जा प्रकल्प बसवल्यामुळे त्या जागेचे एक प्रकारचे आधुनिकीकरण झाले. त्यास एक नवीन रूप मिळले. ती जागा आपल्या चित्रपटासाठी योग्य आहे, कारण यात एका स्त्रीने स्वतःला बदलवण्याच्या केलेल्या उत्कंठाकारक प्रवासाची कहाणी आहे. "या चित्रपटात कॅरोलिनाची भूमिका साकारणाऱ्या इसाबेला ब्रेसेन हिने भूमिकेसाठी मिळालेल्या संधीबद्दल सांगितले की ह्ल, या भूमिकेसाठी मला निवडणे हे माझ्यासाठी जादूभरे होते.आंतरराष्ट्रीय स्तरावर बर्लिन महोत्सव २०१७ मध्ये प्रीमिअर झालेल्या आणि ब्राझील-उरुग्वेची सह-निर्मिती- असलेल्या 'नालु ऑन द बॉर्डर (मुल्हेर दो पै) ' या चित्रपटाद्वारे ऑलिव्हिराने पदार्पण केले आणि २१ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवात १८ पुरस्कार जिंकले. 

 

टॅग्स :cinemaसिनेमाIFFIइफ्फीgoaगोवा