शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

आदर्शनगर, चिखली येथे लागलेल्या आगीत ९ वाहनांचे नुकसान; दोन चारचाकी जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 20:03 IST

वास्को अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहीतीनुसार सोमवारी पहाटे ३.१५ च्या सुमारास सदर घटना घडली.

वास्को: दक्षिण गोव्यातील  सोमवारी पहाटे आदर्शनगर, चिखली भागात असलेल्या रस्त्यावर उभ्या करून ठेवलेल्या ‘वॅगनोर’ चारचाकीत शोर्टसरकीट होऊन वाहनातील ‘बॅट्री’ चा स्फोट होऊन लागलेल्या आगीत त्या ‘वॅगनार’ सहीत अन्य एक चारचाकी जळून खाक झाली. तसेच सदर घटनेत येथे उभ्या करून ठेवलेल्या अन्य वाहनापैंकी पाच दुचाकी व अन्य दोन वाहनांना आगीची झळ बसल्याने त्या वाहनांची बरीच नुकसानी झाली असल्याची माहीती वास्को अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

वास्को अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहीतीनुसार सोमवारी पहाटे ३.१५ च्या सुमारास सदर घटना घडली. आदर्शनगर, चिखली येथील अशीर रस्त्यावर उभ्या करून ठेवलेल्या ‘वॅगनोर’ (क्र: जीए ०६ डी ८४५७) तसेच ‘स्वीफ्ट’ (क्र: जीए ०६ इ २९१६) चारचाकीला भयंकर आग लागली. या आगीची माहीती मिळताच वास्को अग्निशामक दलाच्या जवानांनी बंबासहीत त्वरित घटनास्थळावर धाव घेतली. ही आग भयंकर असून यामुळे येथे उभ्या असलेल्या अन्य वाहनांना सुद्धा धोका निर्माण होणार असल्याचे दिसून येताच या आगीवर नियंत्रण आणण्याच्या कामाला दलाच्या जवानांनी सुरवात करून सुमारे ४५ मिनीटाच्या अथक प्रयत्नानंतर दोन्ही वाहनांना लागलेली आग विझवली.

याबाबत अधिक माहीती घेण्यासाठी वास्को अग्निशामक दलातील सूत्रांना संपर्क केला असता येथे उभ्या असलेल्या ‘वॅगनोर’ चारचाकीला प्रथम आग लागल्याचे तपासणीत समजले असल्याची माहीती त्यांनी दिली. ही आग शोर्टसरकीट झाल्यानंतर त्या चारचाकीत असलेल्या ‘बॅट्री’ चा स्फोट होऊन आग लागल्याचे प्रथम चौकशी वेळी जाणवले असल्याची माहीती अग्निशामक दलाने पुढे दिली.

सदर चारचाकीला आग लागल्यानंतर तिच्या जवळच उभ्या करून ठेवलेल्या त्या ‘स्वीफट’ चारचाकीला सुद्धा आगीने पेट घेऊन या घटनेत दोन्ही चारचाकी जळून खाक झाल्या. याबरोबरच येथे उभ्या करून ठेवलेल्या अन्य ७ वाहनांना आगीची झळ बसल्याने सदर वाहनांची बरीच नुकसानी झाली असून या वाहनात ५ दुचाकी तसेच एक मिनी टेंम्पो व अन्य एका ‘ए स्टार’ चारचाकीचा समावेश असल्याची माहीती अग्निशामक दलाच्या सूत्रांकडून मिळाली. आदर्शनगर, चिखली येथे लागलेल्या या आगीच्या घटनेत एकूण ९ वाहनांना नुकसानी झालेली असून एकूण केवढे नुकसान झाले आहे हे जरी स्पष्ट झाले नसलेतरी सदर लाखो रुपयांची नुकसानी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीत जळून खाक झालेली ती ‘वॅगनोर’ चारचाकी मफाल मार्टीन यांच्या मालकीची असून ‘स्वीफ्ट’ चारचाकी रवी धोत्रे यांच्या मालकीची असल्याची माहीती सूत्रांनी दिली.

सदर घटना पहाटे घडल्याने यावेळी येथे कोणीही नसल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. तसेच घटना घडलेल्या स्थळापासून थोड्याच अंतरावर विद्यालय असून पहाटेच्या वेळी सदर घटना घडल्याने येथे होणारा पुढचा अनर्थ टळल्याची प्रतिक्रीया याभागात राहणाऱ्या काही नागरीकांनी व्यक्त केली. आदर्शनगर भागात लागलेल्या या आगीबाबत येथे राहणाऱ्या काही नागरीकांना कळताच त्यांनी त्वरित अग्निशामक दलाला घटनास्थळावर बोलवून आग विझवल्याने पुढची नुकसानी टळली. वास्को पोलीसांनी त्वरित घटनास्थळावर धाव घेऊन सदर घटनेचा पंचनामा केला असून याप्रकरणात ते अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :fireआगfour wheelerफोर व्हीलरtwo wheelerटू व्हीलरgoaगोवा