मोरजीत गोठ्याला आग
By Admin | Updated: May 14, 2014 07:17 IST2014-05-14T00:49:09+5:302014-05-14T07:17:26+5:30
पेडणे : मरडीवाडा-मोरजी येथील दादी सावंत यांच्या गोठ्याला मंगळवारी सकाळी १० वा. अचानक आग लागून गवत, भात व फर्निचर मिळून तीन लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले.

मोरजीत गोठ्याला आग
पेडणे : मरडीवाडा-मोरजी येथील दादी सावंत यांच्या गोठ्याला मंगळवारी सकाळी १० वा. अचानक आग लागून गवत, भात व फर्निचर मिळून तीन लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. दादी सावंत व कुटुंबीयांनी सकाळी १० पूर्वी गवत गोठ्यात भरून गेले होते. त्यानंतर लगेच गवताला आग लागून भडका उडाला. आगीची माहिती म्हापसा व पेडणे अग्निशामक दलाला कळताच जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तत्पर्वी संपूर्ण गवत अर्ध्याअधिक गोठ्याचे छप्पर जळून खाक झाले होते. पुरेमेतासाठी ठेवलेले भातही या आगीत जळून गेले. आगीची घटना घडताच या भागाचे माजी सरपंच रत्नाकर शेटगावकर, गोपाळ शेटगावकर, संजय सावंत, सदाशिव शेटगावकर व इतर नागरिकांनी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. पेडणे अग्निशामक दलाचे अधिकारी प्रदीप मांद्रेकर, मुकुंद गवंडी, शरद वेंगुर्लेकर, सहदेव चोडणकर, भास्कर तळावणेकर, योगेश मायणकर, सचिन गावकर व म्हापसा अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. या आगीचे संपूर्ण गवताबरोबरच फर्निचर, गोठा व भात जळून खाक झाले. त्यामुळे ३ लाखांपेक्षा जास्त नुकसानी सावंत कुटुंबीयांना सोसावी लागणार आहे. पावसाळा तोंडावर आल्यानंतर मागच्या १०० वर्षांपासून सावंत कुटुंबीय पाळीव जनावरांसाठी पावसात लागणारे कुरण गवत याच गोठ्यात साठवून ठेवत असतात. १३ रोजी सकाळी साठवून ठेवले व ते घरी गेले. त्याच्या मागून अचानक आग लागली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मोरजीचे माजी सरपंच रत्नाकर उर्फ अर्जुन शेटगावकर यांनी या वेळी सावंत कुटुंबीयांना सरकारकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण आरोग्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडे चर्चा करणार असल्याचे सांगून सरकारने दादी सावंत व कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी, अश्ीा मागणी केली. मोरजीचे तलाठी धुरी यांनी आगीच्या घटनेचा पंचनामा केला. मामलेदारांना अहवाल पाठवणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)