शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात फायबर कंपनीला आग, करोडोंची हानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 19:54 IST

टेक फोर्स कम्पोंझिट कंपनीत ऑटोमोबाईलचे सुटे भाग तयार केले जात आहे.

मडगाव : दक्षिण गोव्यातील नेसाय येथील टेक फोर्स कम्पोझिट प्रा.ली कंपनीला आज गुरुवारी भीषण आग लागून अंदाजे दोन कोटींची मालमत्ता जळून खाक झाली. सकाळी सव्वा नउच्या दरम्यान ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत प्राणहाणी झाली नाही. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागली. राज्यातील मडगाव, वेर्णा, फोंडा व कुडचडे येथून बंब आणावे लागले. एकूण 22 बंबचा वापर करुन नंतर आग विझविण्यात अग्निशामक दलांच्या जवानांना यश आले.सुमारे 88 हजार लीटर पाणी तसेच दोनशे लीटर फोमचा आग विझविण्यासाठी वापरण्यात आल्याची माहिती मडगाव अग्निशामक दलाच्या कार्यालयातून देण्यात आली.

टेक फोर्स कम्पोंझिट कंपनीत ऑटोमोबाईलचे सुटे भाग तयार केले जात आहे. आज सकाळी साडेआठ वाजता कंपनीचे काम सुरु करण्यात आले होते. त्यावेळी कटींगचे काम चालू असताना, अचानक स्पार्क होउन आगीचा भडका उडाला. कामगारांनी आग विझविण्यासाठी वापरल्या जाणा:या उपकरणांचा वापर करुन आग विझविण्याचाही प्रयत्न केला, मात्र तो फोल ठरला. मागाहून यासंबधी मडगाव अग्निशामक दलाला त्वरीत कळविण्यात आल्यानंतर दलाचे अधिकारी गील सोझा यांच्या मार्गदर्शनाखाली  जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

आगीत कच्चा मालही जळून खाक झाला. तसेच फायबर ग्लास व अन्य वस्तुं आगीत भस्मसात झाल्या.  मायणा - कुडतरी पोलिसांनीही घटनास्थळी जाउन पहाणी केली. या आग प्रकरणी पुढील तपास चालू आहे.

टॅग्स :fireआगfire crackerफटाके