शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तळावली नावेलीतील ४५ लाख रुपयांची सुवर्णलंकार चोरी प्रकरणी अखेर पोलिसांकडून एफआयआर दाखल

By सूरज.नाईकपवार | Updated: April 6, 2024 12:00 IST

याप्रकरणाचा तपास सुरु होत नसून, पोलिस एफआयआरही नोंदवून घेत नसल्याने त्यांनी चीड व्यक्त केली होती.

सूरज नाईकपवार, लोकमत न्यूजनेटवर्क, मडगाव: गोव्यातील सासष्टीतील तळावली नावेली येथील चोरी प्रकरणी अखेर मडगाव पोलिसांनी एफआयआर दाखल करुन घेतली आहे. अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा पोलिसांनी नोंद केला आहे. २४ मार्च रोजी चोरीची वरील घटना घडली होती. अज्ञात चोरटयाने ४५ लाखांचे सुवर्णलंकार चोरुन नेल्याची तक्रार घरमालक सोहित वेर्णेकर (४२) यांनी मडगाव पोलिस ठाण्यात केली होती. ते अमेरिकेत रहात आहेत.

याप्रकरणाचा तपास सुरु होत नसून, पोलिस एफआयआरही नोंदवून घेत नसल्याने त्यांनी चीड व्यक्त केली होती. शेवटी शुक्रवारी पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेउन तपासकामाला सुरुवात केली आहे.भादंसंच्या ४५४ व ३८० कलमाखाली पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समीर गावकर पुढील तपास करीत आहेत.

२४ मार्च रोजी दुपारी साडेबारा ते सांयकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान चोरीची वरील घटना फ्रँगीपिनी तळावली नावेली येथे घडली होती. अज्ञाताने घराच्या खिडकीचे तावदाने फोडून आत शिरुन सुवर्णलंकार चोरुन नेले होते. यात ब्रॅसलेट, सोनसाखळया, अंगुठया, पैजण व अन्य दागिने होते. चोरीला गेलेल्या या ऐवजांची किमंत ४५ लाख रुपये इतकी आहे.

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस