तळावली नावेलीतील ४५ लाख रुपयांची सुवर्णलंकार चोरी प्रकरणी अखेर पोलिसांकडून एफआयआर दाखल
By सूरज.नाईकपवार | Published: April 6, 2024 12:00 PM2024-04-06T12:00:11+5:302024-04-06T12:00:35+5:30
याप्रकरणाचा तपास सुरु होत नसून, पोलिस एफआयआरही नोंदवून घेत नसल्याने त्यांनी चीड व्यक्त केली होती.
सूरज नाईकपवार, लोकमत न्यूजनेटवर्क, मडगाव: गोव्यातील सासष्टीतील तळावली नावेली येथील चोरी प्रकरणी अखेर मडगाव पोलिसांनी एफआयआर दाखल करुन घेतली आहे. अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा पोलिसांनी नोंद केला आहे. २४ मार्च रोजी चोरीची वरील घटना घडली होती. अज्ञात चोरटयाने ४५ लाखांचे सुवर्णलंकार चोरुन नेल्याची तक्रार घरमालक सोहित वेर्णेकर (४२) यांनी मडगाव पोलिस ठाण्यात केली होती. ते अमेरिकेत रहात आहेत.
याप्रकरणाचा तपास सुरु होत नसून, पोलिस एफआयआरही नोंदवून घेत नसल्याने त्यांनी चीड व्यक्त केली होती. शेवटी शुक्रवारी पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेउन तपासकामाला सुरुवात केली आहे.भादंसंच्या ४५४ व ३८० कलमाखाली पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समीर गावकर पुढील तपास करीत आहेत.
२४ मार्च रोजी दुपारी साडेबारा ते सांयकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान चोरीची वरील घटना फ्रँगीपिनी तळावली नावेली येथे घडली होती. अज्ञाताने घराच्या खिडकीचे तावदाने फोडून आत शिरुन सुवर्णलंकार चोरुन नेले होते. यात ब्रॅसलेट, सोनसाखळया, अंगुठया, पैजण व अन्य दागिने होते. चोरीला गेलेल्या या ऐवजांची किमंत ४५ लाख रुपये इतकी आहे.