अखेर रूपेशची शरणागती
By Admin | Updated: November 2, 2015 02:29 IST2015-11-02T02:29:34+5:302015-11-02T02:29:46+5:30
पणजी : गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देणारा पत्रकार रूपेश सामंत रविवारी (दि.१) न्यायालयात शरण आला. महिला पत्रकारांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा नोंद

अखेर रूपेशची शरणागती
पणजी : गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देणारा पत्रकार रूपेश सामंत रविवारी (दि.१) न्यायालयात शरण आला. महिला पत्रकारांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. मात्र, पोलिसांना रूपेशचा थांगपत्ता लागला नव्हता. अखेर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात तो शरण आला. त्याला पणजी महिला पोलिसांनी तत्काळ अटक करून तीन दिवसांचा रिमांड मिळवला आहे. या प्रकरणी त्याची कसून चौकशी चालू आहे.
रूपेश रविवारी सकाळी १०.३०च्या सुमारास न्यायालयात शरण आला. रूपेश रविवारी शरण येणार असल्याची माहिती त्याचे वकील राजू पवळेकर यांनी पणजी प्रथमवर्ग न्यायालयाला दिली होती. त्यामुळे न्यायमूर्ती एश्ली नरोन्हा रविवारी सुट्टीचा दिवस असूनही न्यायालयात उपस्थित राहिले. रूपेश न्यायालयात शरण आल्याची माहिती न्यायालयाकडून पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व नंतर अटक केली. रूपेशला नंतर गोमेकॉत नेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
संपूर्ण दिवस त्याची चौकशी सुरू होती. दरम्यान, कोठडीतील चौकशीच्यावेळी त्याने तपासाला अजिबात सहकार्य केले नाही. आपण कोणताही गुन्हा केलेला नाही. हे आपल्याविरुद्ध रचले गेलेले षड्यंत्र असल्याचे तो पोलिसांना सांगत होता,
(पान २ वर)