‘सनबर्न’ची फाईल मुख्यमंत्र्यांकडे पडून
By Admin | Updated: December 26, 2015 01:50 IST2015-12-26T01:48:53+5:302015-12-26T01:50:20+5:30
पणजी : गोव्यातील लोकप्रिय सनबर्न आणि सुपरसॉनिक या दोन संगीत महोत्सवांना प्रारंभ होण्यास केवळ एक दिवस

‘सनबर्न’ची फाईल मुख्यमंत्र्यांकडे पडून
पणजी : गोव्यातील लोकप्रिय सनबर्न आणि सुपरसॉनिक या दोन संगीत महोत्सवांना प्रारंभ होण्यास केवळ एक दिवस उरला असताना सरकारची मान्यता मात्र अजूनही मिळालेली नाही. देशभर गाजावाजा झालेल्या या दोन
संगीत महोत्सवांच्या आयोजकांपैकी एकाने ‘लोकमत’ला ही माहिती शुक्रवारी दिली.
आयोजकांनी सहा महिन्यांपूर्वी या संगीत महोत्सवांच्या मान्यतेसाठी सरकारकडे अर्ज केलेले आहेत. अशा मान्यतेसाठी गोवा सरकारची एक खिडकी योजना आहे. या एक खिडकी योजनेमध्ये पर्यटन संचालक, पर्यटन संस्थांचे प्रतिनिधी आणि अन्य सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्या समितीने महोत्सवस्थळाची पाहणी करून त्याचा अहवाल व अर्जाची फाईल मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मान्यतेसाठी त्यांच्याकडे पाठविलेली आहे. ती त्यांच्या टेबलवर आहे. मात्र, त्याला अजूनही मान्यता मिळालेली नाही. या दोन्ही महोत्सवांमध्ये आयोजकांची सुमारे ५० कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने हजारो पर्यटक गोव्यामध्ये येतात. (विशेष प्रतिनिधी)