शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

एफसी गोवा ISL चषकाचे प्रबळ दावेदार: एफसी गोवाचे प्रशिक्षक मनोला मार्केझ

By समीर नाईक | Published: September 30, 2023 6:18 PM

समीर नाईक, पणजी ( गोवा ): एफसी गोवा यंदाच्या आयएसएल हंगामसाठी पूर्णपणे सज्ज आहे. आमच्याकडे विदेशी, भारतीय आणि स्थानिक ...

समीर नाईक, पणजी (गोवा): एफसी गोवा यंदाच्या आयएसएल हंगामसाठी पूर्णपणे सज्ज आहे. आमच्याकडे विदेशी, भारतीय आणि स्थानिक खेळाडू असलेले चांगला संघ आहे. नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता घेऊन मैदानावर उतरणार आहोत. त्यामुळे आम्ही आयएसएल चषकाचे प्रबळ दावेदार असणार आहोत, असे मत एफसी गोवाचे प्रशिक्षक मनोला मार्केझ यांनी व्यक्त केले.

पणजीत आयएसएल हंगामच्या पार्श्भूमीवर एफसी गोवा तर्फे पत्रकार परिषद आयोजित केली होती, यावेळी एफसी गोवाचे सीईओ रवी पुष्कर, प्रशिक्षक मनोला मार्केझ, कर्णधार ब्रँडन फर्नांडिस, व इतर खेळाडू उपस्थित होते.

कोच म्हणाले, "गेल्या दोन वर्षातील आयएसएलमधील आमची कामगिरी चांगली नव्हती, पण प्रत्येक हंगाम हा नवीन असतो, त्यामुळे मागचे सर्व वाईट गोष्टी विसरून यंदा नव्या धोरणासह मैदानावर उतरणार आहोत. यासाठी आवश्यक प्रशिक्षण खेळाडूंना देण्यास आम्ही सुरुवात केली आहे. संघातील प्रत्येक खेळाडूवर आम्ही भर दिला आहे. वैयक्तिकरित्या आम्ही या खेळाडूंना शारीरिक आणि मानसिदृष्ट्या सुदृढ करण्याचे काम केले आहे, त्यामुळे यंदा संघाचा चांगला खेळ समर्थकांना दिसणार आहे, असे मार्केझ यांनी यावेळी सांगितले. एका प्रश्नाला उत्तर देताना मार्केझ यांनी सांगितले की विदेशी खेळाडू, आणि स्थानिक खेळाडू यांच्या स्ट्रेंथ मध्ये खूप फरक दिसून येतो, पण गेल्या वर्षभरात यावरही आम्ही काम केले असून यातून स्थानिक खेळाडूंचा स्ट्रेंथ अधिक पटीने वाढला आहे. याचा फायदा आम्हाला होणार आहे."

"फॅन्सच्या पाठिंब्यामुळे घरेलु मैदानावर आम्ही आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे, पण आता इतर मैदानावर देखील अशीच कामगिरी करण्यावर आमचा भर असणार आहे. शेवटी या सर्व गोष्टी संघातील प्रत्येक खेळाडूवर अवलंबून आहे. भारतीय संघातून खेळण्याचा अनुभव कामी येईल. ब्रँडन फर्नांडीस देशाचे प्रतिनिधित्व करणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते, याबाबतीत मी खूप भाग्यवान आहे. गेल्या काही वर्षात भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूसोबत खेळताना खूप काही शिकता आहे. हा संपूर्ण अनुभव आयएसएलमध्ये कमी येणार आहे, असे एफसी गोवाचा कर्णधार ब्रँडन फर्नांडीस यांनी यावेळी सांगितले. कर्णधार म्हणून माझ्याकडे मोठी जबबदारी आहे, पण कर्णधार हा फक्त टॅग आहे, माझ्यासोबत या संघात माझ्यापेक्षा अनुभवाने श्रेष्ठ खेळाडू आहेत, त्यामुळे त्याचे सल्ले मोलाचे ठरतात. आज मी कर्णधार आहे, उद्या आणि कोण असू शकतो, या गोष्टी चालत राहतात, पण कामगिरीत सातत्य ठेवण्यावर आणि संघातील प्रत्येक खेळाडूला सोबत घेऊन जाण्यावर माझा भर असणार आहे", असेही फर्नांडीस यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :goaगोवाIndian Super Leagueइंडियन सुपर लीग