एफसी गोवा-चर्चिल ब्रदर्स एफसी लढतीने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेला सुरुवात, रविवार होणार सामना
By समीर नाईक | Updated: August 25, 2023 17:08 IST2023-08-25T17:01:44+5:302023-08-25T17:08:20+5:30
२०२३-२४ फुटबॉल हंगामाची सुरुवात यशस्वी चॅरिटी सामन्याने झाली आहे.

एफसी गोवा-चर्चिल ब्रदर्स एफसी लढतीने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेला सुरुवात, रविवार होणार सामना
गोवा फुटबॉल संघटनेच्या महत्त्वाच्या गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेला रविवार, २७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या एफसी गोवा व चर्चिल ब्रदर्स एफसी लढतीने सुरुवात होणार आहे, अशी माहिती गोवा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉ. कायतान फर्नांडिस यांनी दिली.
२०२३-२४ फुटबॉल हंगामाची सुरुवात यशस्वी चॅरिटी सामन्याने झाली आहे. आता गोवा प्रोफेशल लीग सामन्यांच्या पहिल्या दोन फेऱ्यांच्या वेळापत्रक यावेळी जाहीर करण्यात आले. २०२२-२३ फुटबॉल लीग कोणत्याही समस्यांशिवाय यशस्वी झाली होती. यंदाचीही लीग आम्ही आणखी चांगली करण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास डॉ. फर्नांडिस यांनी यावेळी व्यक्त केला.
स्पर्धेच्या पहिल्या दोन टप्प्यातील सामने म्हापसा येथील धुळेर फुटबॉल स्टेडियमवर खेळविण्यात येतील. २८ रोजी सेसा फुटबॉल अकादमी आणि यंग बॉईज ऑफ टोंका तर २९ रोजी गतविजेता धेंपो स्पोर्ट्स क्लबची लढत कुठ्ठाळी विलेजर्स संघाशी होईल. स्पर्धेत नवीनच पदार्पण केलेला जीनो स्पोर्ट्स क्लब आपल्या मोहिमेची सुरुवात २ सप्टेंबर रोजी चर्चिल ब्रदर्स विरूद्धच्या लढतीने - करेल, असेही डॉ. फर्नांडिस यांनी सांगितले.
पहिल्या फेरीतील सामनेः (सर्व सामने म्हापसा धुळेर मैदानावर खेळविण्यात येणार)
२७ ऑगस्ट रोजी - एफसी गोवा वि. चर्चिल ब्रदर्स.
२८ ऑगस्ट रोजी - सेसा फुटबॉल अकादमी वि. यंग बॉईज ऑफ टोंका. २९ ऑगस्ट रोजी - धेंपो स्पोर्ट्स क्लब वि. कुठ्ठाळी.
३० ऑगस्ट रोजी - पॅक्स ऑफ नागवा वि. स्पोर्टिंग क्लुब दी गोवा.
१ सप्टेंबर रोजी - गार्डीयन ऍजल क्लब वि. वास्को स्पोर्ट्स क्लब.
दुसऱ्या फेरीतील सामनेः (सर्व सामने म्हापसा धुळेर मैदानावर खेळविण्यात येणार)
२ सप्टेंबर रोजी - चर्चिल ब्रदर्स क्लब वि. जीनो स्पोर्ट्स क्लब.
३ सप्टेंबर रोजी - पणजी फुटबॉलर्स वि. धेंपो क्लब.
४ सप्टेंबर रोजी - स्पोर्टिंग क्लुब दी गोवा वि. एफसी गोवा.
५ सप्टेंबर रोजी - कुठ्ठाळी विलेजर्स वि. कळंगूट असोसिएशन.
६ सप्टेंबर रोजी - सेसा फुटबॉल अकादमी वि. गार्डीयन ऍजल क्लब.
७ सप्टेंबर रोजी - वास्को स्पोर्ट्स क्लब वि. पॅक्स ऑफ नागोवा.