वडील ठार, मुलासह नातू गंभीर

By Admin | Updated: December 26, 2015 01:48 IST2015-12-26T01:47:50+5:302015-12-26T01:48:01+5:30

डिचोली : डिचोली-साखळी हमरस्त्यावर वाठादेव-सर्वण बसस्टॉपजवळ शुक्रवारी दुपारी इनोव्हा गाडीने स्कूटरला जबर

Father killed, grandson grandson with son | वडील ठार, मुलासह नातू गंभीर

वडील ठार, मुलासह नातू गंभीर

डिचोली : डिचोली-साखळी हमरस्त्यावर वाठादेव-सर्वण बसस्टॉपजवळ शुक्रवारी दुपारी इनोव्हा गाडीने स्कूटरला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात अंकुश मांद्रेकर (६५, रा. बाराजणनगर, डिचोली) ठार झाले, तर त्यांचा मुलगा दीपक मांद्रेकर (४५) व नातू अंगत मांद्रेकर (१२) गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळात उपचार सुरू आहेत.
डिचोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी पाऊणच्या सुमारास हा अपघात घडला. जीए ०४-के ४४५६ क्रमांकाची सुझुकी स्वीस ही दुचाकी घेऊन अंकुश, दीपक व अंगत मांद्रेकर साखळीच्या दिशेने जात होते. साखळीहून डिचोलीकडे येणाऱ्या एमएच ०४ जीएन ७७९९ या इनोव्हा गाडीने स्कूटरला जोरदार धडक दिल्याने दुचाकीच्या चिंधड्या उडाल्या व इनोव्हा उलटून पडली. या जबर धडकेत दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने डिचोली इस्पितळात हलवण्यात आले. उपचाराच्यावेळी अंकुश मांद्रेकर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. दीपक मांद्रेकर व अंगत मांद्रेकर यांच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेमुळे डिचोली आणि परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
डिचोली पोलीस ठाण्याचे जगदिश गावकर यांनी पंचनामा केला. या प्रकरणी इनोव्हा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक निनाद देऊलकर तपास करीत आहेत.
(प्रतिनिधी)

Web Title: Father killed, grandson grandson with son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.