मताधिक्य घटणार सदगुरू पाटील ल्ल पणजी
By Admin | Updated: February 15, 2015 01:50 IST2015-02-15T01:50:41+5:302015-02-15T01:50:41+5:30
पणजी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर हे निवडून येतील, हे मतदान प्रक्रियेनंतर स्पष्ट झाले आहे.

मताधिक्य घटणार सदगुरू पाटील ल्ल पणजी
पणजी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर हे निवडून येतील, हे मतदान प्रक्रियेनंतर स्पष्ट झाले आहे. भाजपचा हा सलग सहावा विजय असेल; पण भाजपचे मताधिक्य थोडे घटले असल्याचे निवडणूक निकालातून स्पष्ट होईल, असा अंदाज आहे.
२०१२च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपला पणजीत अकरा हजार मते मिळाली होती. त्या वेळी काँग्रेसचे उमेदवार यतीन पारेख यांना पाच हजार मते मिळाली होती. लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने पणजीत जास्त प्रचार केला नाही; पण साडेचार हजार मते मिळाली होती. काँग्रेसचे उमेदवार सुरेंद्र फुर्तादो हे आता पाच किंवा सव्वापाच
हजार मते प्राप्त करतील, असा अंदाज आहे. पणजी मतदारसंघातील ख्रिस्ती व
मुस्लिम धर्मियांची एकगठ्ठा मते
काँग्रेसला मिळाल्याची चर्चा आहे. मनोहर पर्रीकर हे भाजपतर्फे निवडणूक लढवायचे, तेव्हा ख्रिस्ती धर्मियांची मते फुटायची. काँग्रेसला एकगठ्ठा मते मिळत नव्हती. या वेळी ती मते फुटलेली नाहीत, असे मानले जात आहे.
२२ हजार ५७ पैकी एकूण १५ हजार ७०४ मतदारांनी शुक्रवारी मतदान केले आहे. पंधरा हजारांपैकी पाच हजार मते काँग्रेसने प्राप्त केली, तर दहा हजार सातशे मते शिल्लक राहतात. त्यापैकी नऊ हजारपेक्षा जास्त मते भाजपला मिळतील, असे राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे. एक हजार ते बाराशे मते ही समीर केळेकर आणि सदानंद वायंगणकर यांच्यात विभागून जातील.
आम आदमी पक्षाचे काही कार्यकर्ते
केळेकर यांच्या बाजूने राहिले, तर काही कार्यकर्ते त्यांच्या विरोधात राहिले. काही भाजप समर्थकांची मते वायंगणकर यांना मिळालेली असतील.
भाजपची स्वत:ची मते या पोटनिवडणुकीत जास्त फुटलेली नाहीत. भाजपचे काही समर्थक उमेदवारावर नाराज होते; पण मतांमध्ये जास्त फूट पडलेली नाही. पर्रीकर यांनी प्रत्येक बुथ क्षेत्रावर लक्ष दिले व भाजपची जास्त मते फुटणार नाहीत, याची काळजी घेतली. पोटनिवडणुकीच्या शेवटच्या दोन दिवसांत काँग्रेसचे सांताक्रुझचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनीही आपले बळ भाजपच्या बाजूने टाकले. अर्थात, मोन्सेरात यांच्यामुळे भाजपला जास्त मते मिळाली, असे म्हणता येणार नाही. भाजपने स्वत:ची मते बऱ्याच प्रमाणात कायम राखली आहेत. हिंदू धर्मिय मतदारांची जास्त मते फुर्तादो यांना मिळालेली नाहीत, असा निष्कर्ष काढता येतो.