फेसबुकवरून महिलेला २४ लाखांचा गंडा

By Admin | Updated: December 2, 2015 01:30 IST2015-12-02T01:30:34+5:302015-12-02T01:30:55+5:30

पणजी : कोट्यवधी रुपयांचे दागिने आणि भेटवस्तू पाठविण्याचे आमिष दाखवून खोटी फेसबुक प्रोफाईल बनविलेल्या

Facebook gives 24 lakhs of money to Facebook | फेसबुकवरून महिलेला २४ लाखांचा गंडा

फेसबुकवरून महिलेला २४ लाखांचा गंडा

पणजी : कोट्यवधी रुपयांचे दागिने आणि भेटवस्तू पाठविण्याचे आमिष दाखवून खोटी फेसबुक प्रोफाईल बनविलेल्या भामट्यांकडून एका महिलेला २४ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणात सायबर क्राईम विभागाकडून अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही फेसबुक प्रोफाईल जेम्स रॉबर्ट व बासील अँडरसन या बोगस नावांनी करण्यात आली होती. तक्रारदार महिलेला या भामट्याने आपल्या जाळ्यात फसविताना तिला कोट्यवधी रुपयांचे मौल्यवान दागिने देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी विविध स्किम्स असल्याचे सांगण्यात आले आणि त्यासाठी विविध बँकांतील विशिष्ट खात्यांत विविध प्रकारचा कर म्हणून पैसे भरण्यास सांगितले. दुसऱ्या प्रोफाईलमधून तिला युके पौंड्स (विदेशी चलन) पाठविण्यात येईल, असेही सांगण्यात आले. त्यासाठीही कराचे पैसे भरण्यास सांगितले. या भूलथापांना ही महिला बळी पडली आणि दोन्ही प्रकरणांत मिळून २४.२१ लाख रुपये जमा केले.
हे पैसे जमा करण्यासाठी या महिलेने ५ महिने घेतले आणि दागिने व गिफ्टची प्रतीक्षा करीत राहिली. मात्र, त्यानंतर तिला दागिने व गिफ्ट सोडाच; परंतु फेसबुकवरील त्या दोन्ही प्रोफाईलवरून प्रतिसादही बंद झाला. त्यामुळे आपल्याला फसविले गेल्याचा संशय तिला आला व तिने सायबर क्राईम विभागात तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)

Web Title: Facebook gives 24 lakhs of money to Facebook