परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांची SCO सरचिटणीस झांग मिंग यांच्याशी चर्चा
By किशोर कुबल | Updated: May 4, 2023 13:26 IST2023-05-04T13:25:46+5:302023-05-04T13:26:29+5:30
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लॅवरोव आज सकाळी एससीओच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी गोव्यात दाखल झाले आहेत

परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांची SCO सरचिटणीस झांग मिंग यांच्याशी चर्चा
किशोर कुबल/ पणजी
पणजी : गोव्यात शांघाय को ॲापरेशन ऑर्गनायझेशनच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीपूर्वी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर यांनी ऑर्गनायझेशनचे सरचिटणीस झांग मिंग यांची भेट घेतली.रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅवरोव व चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग यांच्यासोबत ते द्विपक्षीय बैठका घेणार आहेत.
जयशंकर व्टीटमध्ये म्हणतात की,‘झांग मिंग यांच्याशी फलदायी संवाद साधून बैठकांना सुरुवात केली. पारंपारिक औषध, युवा सशक्तीकरण, बौद्ध वारसा आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान यावर भर राहणार आहे.
दरम्यान, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लॅवरोव आज सकाळी एससीओच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी गोव्यात दाखल झाले आहेत. आज ४ आणि उद्या ५ अशा दोन दिवस या बैठका चालणार आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहारमंत्री बिलावल भुत्तो झरदारी हेही येणार असून आठ राष्ट्रांचे विदेशमंत्री दोन दिवसीय बैठकीत भाग घेणार आहेत. पाकिस्तान, चीन, रशिया, भारत तसेच मध्य आशियाई राष्ट्रें कझाकस्तान, किर्गिस्तान, ताझिकिस्तान व उझ्बेकीस्तान ही आठ राष्ट्रे शांघाय को-ॲापरेशन ऑर्गनायझेशनची सदस्य आहेत.