S. Jaishankar: एससीओमध्ये सुधारणा आणि आधुनिकीकरणाचे, विदेशमंत्री जयशंकर यांचे आवाहन
By किशोर कुबल | Updated: May 5, 2023 14:08 IST2023-05-05T14:07:51+5:302023-05-05T14:08:35+5:30
S. Jaishankar: गोव्यात चालू असलेल्या शांघाय को ॲापरेशन ॲार्गनायझेशन सदस्य राष्ट्रांच्या बैठकीत शंभरहून अधिक सहभागींचा उत्साहपूर्ण सहभाग दिसला, असे केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर सांगितले.

S. Jaishankar: एससीओमध्ये सुधारणा आणि आधुनिकीकरणाचे, विदेशमंत्री जयशंकर यांचे आवाहन
- किशोर कुबल
पणजी - गोव्यात चालू असलेल्या शांघाय को ॲापरेशन ॲार्गनायझेशन सदस्य राष्ट्रांच्या बैठकीत शंभरहून अधिक सहभागींचा उत्साहपूर्ण सहभाग दिसला, असे केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर सांगितले.
"जागतिक संस्थांना सध्याच्या संकटांमुळे आव्हानांना वेळेवर आणि प्रभावीपणे तोंड देण्याच्या बाबतीत क्षमतेमध्ये कमतरता दिसून आली आहे," असे ते म्हणाले. इराण आणि बेलारूस यांना पूर्ण सदस्य देश म्हणून प्रवेश संघटनेत प्रवेश दिला जावा तसेच मंदारिन आणि रशियन भाषेसोबत इंग्रजीही तिसरी भाषा म्हणून संघटनेने स्विकारावी, असेही जयशंकर म्हणाले.
संघटनेमध्ये सुधारणा आणि आधुनिकीकरणाचे आवाहन त्यांनी केले. स्टार्टअप्स आणि इनोव्हेशन आणि पारंपारिक औषधांवर दोन नवीन कार्य गट तयार करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला सदस्य देशांनी समर्थना दिल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.