खनिज निर्यात कर फेरआढावा नाही
By Admin | Updated: December 22, 2015 01:28 IST2015-12-22T01:27:56+5:302015-12-22T01:28:14+5:30
पणजी : खनिजावरील निर्यात कराचा फेरआढावा घेण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर नसल्याचे केंद्रीय वाणिज्यमंत्री

खनिज निर्यात कर फेरआढावा नाही
पणजी : खनिजावरील निर्यात कराचा फेरआढावा घेण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर नसल्याचे केंद्रीय वाणिज्यमंत्री निर्मला सीथारामन् यांनी लोकसभेत लेखी उत्तरात स्पष्ट केले.
विदेश व्यापार धोरणांतर्गत काही ग्रेडचे खनिज नियंत्रित केले जाते, शिवाय निर्यात नियमनासाठी वेगवेगळे कर लावले जातात, असे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक पोलाद उद्योगांची खनिजाची गरज भागावी म्हणून अनेक उपाययोजना आधीच केलेल्या आहेत. तूर्त निर्यात धोरणाबाबत फेरआढाव्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे त्या म्हणाल्या.
गोव्यातील खाण उद्योजकांनी ५८ टक्के ग्रेडपेक्षा कमी खनिजाच्या निर्यातीवरील १0 टक्के कर रद्द करावा, अशी मागणी केलेली आहे. राज्यात मुख्यत्वे ५५ ते ५८ टक्के ग्रेडपर्यंतचेच खनिज मिळते आणि ते खास करून चीन व जपानला निर्यात केले जाते. सीथारामन् यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते आॅगस्ट या काळात भारताने ५३.३५ दशलक्ष टन खनिज निर्यात केले. २0१४-१५ मध्ये १२८.७९ दशलक्ष टन, (पान २ वर)