मोदींच्या ड्रेसवर दिवसाला दहा लाखांचा खर्च - केजरीवाल
By Admin | Updated: June 30, 2016 19:08 IST2016-06-30T19:08:44+5:302016-06-30T19:08:44+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दररोजच्या कपडय़ांवरील खर्च दिल्ली सरकारच्या एकूण जाहिरातींच्या खर्चाहून अधिक आहे, अशी टीका आपचे सव्रेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

मोदींच्या ड्रेसवर दिवसाला दहा लाखांचा खर्च - केजरीवाल
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. ३० - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दररोजच्या कपडय़ांवरील खर्च दिल्ली सरकारच्या एकूण जाहिरातींच्या खर्चाहून अधिक आहे, अशी टीका आपचे सव्रेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी येथे केली. गोव्यातील संपादकांशी केजरीवाल यांनी सकाळी संवाद साधला.
ते म्हणाले, मोदींच्या प्रत्येक ड्रेसचा खर्च दोन लाख रुपये आहे. दिवसाला ते किमान पाच ड्रेस बदलतात, त्याचेच दहा लाख रुपये होतात. एकदा वापरलेला ड्रेस ते पुन्हा वापरत नाहीत. याची आपण फेसबुक पेजवर शहानिशा करू शकता. सातशे दिवसांच्या त्यांच्या ड्रेसचे सत्तर कोटी रुपये होतात.