शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोमुनिदाद जागा हडप प्रकरणी मंत्री गुदिन्हो यांना मंत्रिमंडळातून वगळा; काँग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2024 17:04 IST

गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस कॅप्टन विरियटो फर्नांडिस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन पंचायत मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्या ह्या कृत्याचा पर्दाफाश केला.

नारायण गावस

पणजी : भाजप सरकारमधील मंत्री माविन गुदिन्हाे यांनी काेमुनिदाद कायद्यातील नवीन दुरस्ती वापरुन आपल्या मुलाला ४०० चौरस मीटरचा भूखंड दिला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याची दखल घेते या मंत्र्याचे मंत्रीपद काढावे, अशी मागणी कॉँग्रेस पक्षातर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आली. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस कॅप्टन विरियटो फर्नांडिस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन पंचायत मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्या ह्या कृत्याचा पर्दाफाश केला.  काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर आणि जॉन नाझरेथ हे देखील यावेळी उपस्थित होते. 

विरियटो फर्नांडिस म्हणाले, "प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने कोमुनिदादच्या संहितेत केलेल्या या दुरुस्त्यांमुळे भ्रष्टाचार वाढला पक्षाचे स्वतःच्या आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी कोमुनिदादच्या जमिनी बळकावण्याचे हेतू आणि स्वार्थी हेतू उघड झाले आहेत." जून २०२३ मध्ये, कोमुनिदादच्या प्रधान संहितेच्या कलम ३३४- अ मध्ये १८ वर्षे पूर्ण झालेल्या संबंधित कोमुनिदादच्या भागधारकाच्या "भूमिहीन" मुलांना कोमुनिदादचे भूखंड वाटप करण्याची परवानगी देण्यासाठी सोयीस्करपणे दुरुस्ती करण्यात आली.  पण या लोकांना त्याचा लाभ होत नाही मंत्री आमदार आपला लाकान ही जागता हडप करुन देत आहे.

कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, मंत्र्यांच्या मुलाने शपथपत्रात असे म्हटले आहे की त्यांच्याकडे कोणतीही निवासी जमीन नाही आणि त्यांना नवीन वाटपानुसार जमीन देण्यात यावी. पण त्याच्या नावावर आधीच तीन प्लॉट आहेत. हे एकूण भ्रष्टाचाराचे प्रकरण आहे, जिथे मंत्र्यांच्या मुलाला नवीन दुरुस्तीचा फायदा झाला आहे.

ते म्हणाले की, कोणतेही शासकीय प्रमाणपत्र घेताना सर्वसामान्यांना त्रास दिला जातो, मात्र मंत्र्यांच्या पुत्रांना दुरुस्त्या करून भूखंड दिले जातात. मुख्यमंत्री या प्रकरणात गुंतले आहेत कारण त्यांच्या सरकारने दुरुस्ती केली आहे. या भ्रष्ट मंत्र्याला तात्काळ बडतर्फ करावे,’ अशी मागणी पाटकर यांनी केली.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा