शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अनमोड येथे बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक करणारी खासगी बस जप्त, अबकारी खात्याची कारवाई

By आप्पा बुवा | Updated: April 27, 2023 19:59 IST

गेल्या काही दिवसापासून अशाप्रकारच्या कारवाईत वाढ झाली असून आतापर्यंत एक कोटी रुपयां पेक्षाही अधिक मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

फोंडा - अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी रविवारी एका ट्रकसह आठ लाखाची दारू पकडल्यानंतर बुधवारी पुन्हा एकदा अनमोड येथील चेक नाक्यावर बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक करणारी खासगी बस जप्त केली आहे. गेल्या काही दिवसापासून अशाप्रकारच्या कारवाईत वाढ झाली असून आतापर्यंत एक कोटी रुपयां पेक्षाही अधिक मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. बुधवारी रात्री केलेल्या कारवाईत खासगी बस चालक सुप्रीम मंजुनाथ (बंगलोर) याला अटक करण्यात आली आहे. 

   सविस्तर माहिती नुसार मागच्या एका महिन्यात मोठ्या प्रमाणावर दारू वाहतूक करणारी प्रकरणे पकडल्यानंतर सीमेवरील कर्नाटकातील अबकारी खाते सतर्क झाले आहे.  गोव्यातून बंगलोर येथे बुधवारी मध्यरात्री जाणाऱ्या केए - ५१- एएच -७३६२ क्रमांकाची खासगी बसची नेहमीप्रमाणे  झडती घेतली असता अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांना सुमारे ६५ लिटर दारू बसमध्ये सापडली. यासंदर्भात खासगी बस चालकाला अटक करण्यात आली आहे.अनमोड अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी बस सह सुमारे ४५ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. कर्नाटकात विधानसभा निवडणूक जवळ आल्याने येत्या काही दिवसात गोव्यातून मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अनमोड येथील अबकारी खात्याचे उपनिरीक्षक श्रीकांत तळसूदे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी रात्री कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. मागच्या तीन महिन्यात किमान दहा ते पंधरा वेळा तरी अनमोड च्या अबकारी अधिकाऱ्यांनी गोव्यातून कर्नाटकात जाणारी दारू पकडली आहे. सदरची सर्व वाहने हि मोले चेक नाक्यावरूनच गेली होती. मोले येथे सुद्धा चेक नाका असताना एवढ्या लाखो रुपयाची दारू सातत्याने कर्नाटकात जातीच कशी हा प्रश्न आता निर्माण होत आहे .कदाचित मोले येथील अधिकाराच्या संगणमतानेच हि दारू पाठवण्यात येत असल्याचा संशय आता बळावू लागला आहे 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवाPoliceपोलिस