शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"गोव्यात स्थायिक व्हायला सर्वांना आवडते, परंतु राज्याची क्षमता आधी तपासा"

By किशोर कुबल | Updated: July 2, 2024 14:49 IST

- सुरेश प्रभू: पश्चिम घाटातील पर्यावरणाचेही संरक्षण करण्याचे आवाहन

किशोर कुबल/पणजी 

पणजी :  'गोव्यात स्थायिक व्हायला सर्वांनाच आवडते. गोवा हे दिल्लीचे तर विस्तार केंद्रच बनले आहे. लोकसंख्या वाढत असल्याने गोव्याच्या क्षमतेचा शास्त्रीय अभ्यास होणे आवश्यक आहे. तसेच पश्चिम घाटातील पर्यावरणाचे रक्षण होणेही तेवढेच गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले. शहरातील एका पंचतारांकित हॉटेलात  'टेरी'च्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रभू म्हणाले की, 'गोवा हा शांत प्रदेश आहे येथील लोकांचे आदरातिथ्य अन्य प्रदेशांमध्ये लोकांना भावते. दिल्लीतील अनेकांनी येथे आपले 'सेकंड होम' केले आहे. निवृत्तीनंतर वरिष्ठ अधिकारीही गोव्यात स्थायिक व्हायला बघतात. इतर राज्यातील लोकांना गोव्यात स्थायिक होणे आवडते. परंतु येथील उपलब्ध पायाभूत सुविधांच्या तुलनेत क्षमता तपासणेही तेवढेच गरजेचे आहे. त्यासाठी शास्त्रीय पद्धतीने अभ्यास व्हायला हवा.'

ते पुढे म्हणाले की, 'गोव्याच्या पश्चिम घाटात दुर्मिळ वनस्पती, प्राण्यांच्या जाती आहेत. पश्चिम घाटातील पर्यावरणाचे संवर्धन होणे काळाची गरज आहे.'

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेही या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, पर्यावरणाबाबत सरकार गंभीर आहे. सांडपाणी प्रक्रिया न करणाऱ्या कारखान्यांवर सरकार कारवाई करणार आहे. कारखान्यांनी स्वतःचा प्रक्रिया प्रकल्प (ईटीपी) स्थापन करणे अनिवार्य आहे.

टॅग्स :Suresh Prabhuसुरेश प्रभूgoaगोवा