शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात प्रत्येक दुस-या दिवशी एका बालकावर अत्याचार,  गेल्या तीन वर्षांत 707 घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 19:41 IST

गोवा हे महिलांसाठी सुरक्षित राज्य असल्याचे प्रमाणपत्र दिल्लीच्या एका एनजीओने केलेल्या सर्वेक्षणात दिले असले तरी लहान मुलांसाठी गोवा खरेच सुरक्षित राज्य आहे का?  हा प्रश्न सरकारी आकडेवारी पाहिल्यास कुणाच्याही तोंडी येऊ शकेल.

मडगाव:  गोवा हे महिलांसाठी सुरक्षित राज्य असल्याचे प्रमाणपत्र दिल्लीच्या एका एनजीओने केलेल्या सर्वेक्षणात दिले असले तरी लहान मुलांसाठी गोवा खरेच सुरक्षित राज्य आहे का?  हा प्रश्न सरकारी आकडेवारी पाहिल्यास कुणाच्याही तोंडी येऊ शकेल. गोव्यात प्रत्येक दुस-या दिवशी एका लहान मुलावर अत्याचार होत असल्याचे उघड झाले असून मागच्या तीन वर्षांत अशी 707 प्रकरणे पुढे आली आहेत.गोवा सरकारने नियुक्त केलेल्या पीडित आधार केंद्राच्या आकडेवारीवरुन एप्रिल 2014 ते मार्च 2017 या तीन वर्षाच्या कालावधीत लहान मुलांवर अत्याचार होण्याच्या एकूण 707 घटना नोंद झाल्या असून त्यातील 289 प्रकरणे मुलांसंबंधी असून 418 प्रकरणो मुलींसंदर्भात आहेत. यापैकी 183 प्रकरणे लैंगिक अत्याचारासारखी गंभीर आहेत.आम आदमी पक्षाच्या महिला आघाडीने मंगळवारी बालदिनाचे निमित्त साधून दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अंजली सेहरावत यांना सादर केलेल्या निवेदनात या गंभीर बाबीकडे लक्ष वेधले आहे. या लहान मुलांवर होणारे बहुतेक अत्याचार शाळेत किंवा बालसुधारगृहे व तत्सम आश्रय गृहात झाल्याचे या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे.यासंबंधी ‘लोकमत’शी बोलताना आप महिला आघाडीच्या राजश्री नगर्सेकर यांनी गोवा सरकारने या घटनांकडे गांभीर्याने पहाण्याची गरज व्यक्त केली. गोव्यातील शाळा व इतर ठिकाणी जेथे लहान मुलांचा वावर असतो तेथे सरकार नियुक्त समितीने जाऊन वस्तुस्थितीची पहाणी करणो गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. असे प्रकार होऊ नयेत यासाठी पोलीस यंत्रणा, सामाजिक कार्यकर्ते, शाळा व्यवस्थापन यांच्यामध्ये संवेदनशीलता निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.मंगळवारी या महिला आघाडीने जिल्हाधिका:यांना सादर केलेल्या निवेदनात उत्तर गोव्याप्रमाणो दक्षिण गोव्यातही अत्याचार पिढीत मदत केंद्र सुरु करण्याबरोबरच पंचायत व नगरपालिका स्तरावर बालसमित्या नेमण्याची गरज व्यक्त केली. हे अत्याचार थांबावेत म्हणून सर्व घटकांकडून एकत्रित प्रयत्न होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :goaगोवाCrimeगुन्हा