एस्कॉर्ट सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
By Admin | Updated: July 19, 2015 01:45 IST2015-07-19T01:45:49+5:302015-07-19T01:45:59+5:30
पणजी : एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली परराज्यातील आणि परदेशातील युवतींना गोव्यात आणून वेश्या व्यवसायासाठी पुरविणारे रॅकेट गुन्हा अन्वेषण विभागाने

एस्कॉर्ट सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
पणजी : एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली परराज्यातील आणि परदेशातील युवतींना गोव्यात आणून वेश्या व्यवसायासाठी पुरविणारे रॅकेट गुन्हा अन्वेषण विभागाने उघडकीस आणले आहे. या कारवाईत एका रशियन युवतीसह तिघींची सुटका करण्यात आली. तर पाच दलालांना अटक करण्यात आले आहे.
पर्वरी येथील एका बड्या हॉटेलजवळ सापळा रचून सीआयडीकडून या दलालांना
पकडले. पाचपैकी चार गोव्याबाहेरील तर एक गोमंतकीय आहे.
या प्रकरणात आणखी काहीजणांना अटक होण्याची शक्यता सीआयडीकडून व्यक्त करण्यात आली आहे. निरीक्षक दत्तगुरू सावंत आणि त्यांच्या साथीदारांनी केलेली ही सलग चौथी कारवाई असून मागील आठवड्यात म्हापसा येथे एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता.
(प्रतिनिधी)