माकडतापाची तीन राज्यांत लागण

By Admin | Updated: March 12, 2016 02:38 IST2016-03-12T02:36:01+5:302016-03-12T02:38:16+5:30

पणजी : माकडतापाचा गोव्यासह महाराष्ट्र व कर्नाटकमध्येही फैलाव झालेला आहे, असे आरोग्य खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा

Epidemic in Three States of Epidemic | माकडतापाची तीन राज्यांत लागण

माकडतापाची तीन राज्यांत लागण

पणजी : माकडतापाचा गोव्यासह महाराष्ट्र व कर्नाटकमध्येही फैलाव झालेला आहे, असे आरोग्य खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांना सांगितले.
डिसोझा म्हणाले की, तीन राज्यांतील जंगल क्षेत्रांमध्ये माकडतापाचा फैलाव झाला आहे. माकडताप होऊ नये म्हणून सरकारने आणलेल्या औषधाचे एकूण आठ डोस घ्यावे लागतात. पहिल्या वर्षी तीन डोस व नंतर प्रत्येकी एक डोस याप्रमाणे सहा वर्षे डोस घेणे गरजेचे आहे. या वेळी सत्तरी तालुक्यात आम्ही डोस देण्याचा कार्यक्रम व्यापक प्रमाणात राबवत आहोत. अकराशे नागरिकांनी पहिला डोस घेतला. आता आणखी दोन हजार औषधे आणली जातील. आदेश दिला असून लवकरच ती पोहचतील.
डिसोझा म्हणाले की, गुरुवारी जयश्री गावकर या म्हाऊस-सत्तरी येथील महिलेचा मृत्यू झाला. हा मृत्यू पूर्णपणे माकडतापामुळे झालेला आहे.
सरकारी इस्पितळांच्या निवासी गाळ्यांची स्थिती दयनीय असून त्यांचे नूतनीकरण करण्याची गरज आहे, असे डिसोझा यांनी सांगितले. अर्र्थसंकल्पात आरोग्य खात्यासाठी जास्त निधीची तरतूद करावी, अशी विनंती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना करीन. सरकारची आरोग्य विमा योजना येत्या जुलैपासून अमलात येईल. याद्वारे एकूण ४४७ रोगांची काळजी घेईल.

Web Title: Epidemic in Three States of Epidemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.