दिल्लीतील इंग्रजी शाळांना सरकारी अनुदान नाही
By Admin | Updated: July 6, 2016 11:32 IST2016-07-06T11:32:10+5:302016-07-06T11:32:10+5:30
संघ परिवाराचा घटक असलेल्या विद्याभारतीच्या दिल्लीत काही शाळा या अपरिहार्य कारणांमुळे इंग्रजी माध्यमातून चालविल्या जात आहेत.

दिल्लीतील इंग्रजी शाळांना सरकारी अनुदान नाही
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. ६ - संघ परिवाराचा घटक असलेल्या विद्याभारतीच्या दिल्लीत काही शाळा या अपरिहार्य कारणांमुळे इंग्रजी माध्यमातून चालविल्या जात आहेत, परंतु या शाळा सरकारकडून अनुदान घेत नाहीत अशी माहिती विद्या भारती शिक्षण संस्थेचे अखिल भारतीय स्थरावरील पश्चिम क्षेत्रीय प्रमुख दिलीप बेतकीकर यांनी दिली आहे. इंग्रजीसाठी आग्रह धरणा-या गोव्यातील फोर्स या संघटनेने केलेल्या आरोपांसंबंधी विचारले असता त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.
बेतकीकर म्हणाले की ‘मी सध्या विद्याभारतीच्या कामासाठी दिल्ली येथे गेलो असल्यामळे फोर्सतर्फे नेमके काय सांगण्यात आले याची मला कल्पना नाही. मातृभाषेतून शिक्षण हे विद्याभारतीचे धोरण आहे. केवळ दिल्लीत काही विद्यालये काही अपरिहार्यकारणामुळे इंग्रजी माध्यातून चालविली जात आहेत. या शाळांना सरकारकडून अनुदान मिळत नाही आणि सरकारकडे या विद्यालयांसाठी अनुदानाची मागणीही केली गेलेली नाही. त्यामुळे दिल्लीचा संबंध गोव्याच्या माध्यम मुद्याशी जोडणे गैर ठरेल’
संपूर्ण देशभर विद्या भारतीच्या शाळा असून त्या त्या ठिकाणी स्थानिक भाषातून शिक्षण दिले जात आहे. हल्लीच आसाममध्ये शालान्त परीक्षेत सर्वप्रथम आलेला सर्फराज हुसेन हाही विद्या भारतीच्या विद्यालयाती विद्यार्थी असून मातृभाषेतुनच त्याचे शिक्षण झाले होते असे ते म्हणाले.
फोर्स या संघटनेने मंगळवारी मडगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत माध्यम मुद्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली होती. दिल्लीत संघ परिवाराच्या शाळा इंग्रजी माध्यमातून चालतात आणि गोव्यात मात्र इंग्रजी माद्यमाला विरोध करून दुटप्पी भुमिका घेतात असा आरोप संघटनेचे निमंत्रक सावियो लोपीस यांनी केला होता. दरम्यान गोव्यात माध्यम मुद्यावर मातृभाषेतून शिकविणाºयाच विद्यालयांना सरकारी अनुदान मिळावे यासाठी भारतीय भाषा सुरक्षा मंच लढा देत असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ह्या मंचाचे महत्त्वाचे घटक आहेत.