शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

विद्वेशपूर्ण भाषणाबद्दल ख्रिस्ती धर्मगुरूंवर होणार कारवाई?; निवडणूक आयोगाकडून चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 21:23 IST

दक्षिण जिल्हाधिकारी लवकरच अहवाल सादर करणार

मडगाव: दक्षिण गोव्यातील राय येथील चर्चचे पाद्री फा. कोसेन्सांव डिसिल्वा यांच्या विद्वेशपूर्ण उपदेशासंदर्भात जे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, त्याची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेतली असून यासंदर्भात दक्षिण गोव्याचे निवडणूक अधिकारी असलेले जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी चौकशी सुरु केली आहे. विद्वेशपूर्ण भाषणांचे एकूण चार व्हिडिओ निवडणूक आयोगासमोर आले आहेत.यासंदर्भात रॉय यांच्याशी संपर्क साधला असता, निवडणूक यंत्रणोने या व्हिडिओची गंभीर दखल घेतली असून यासंदर्भात चौकशी सुरु केली आहे. मात्र सध्या तरी कुणालाही समन्स जारी केलेले नाहीत असे त्यांनी सांगितले. रॉय लवकरच आपला अहवाल आयोगाला सादर करणार आहेत.फा. डिसिल्वा यांनी चर्च पल्पीट (मंच)चा वापर करीत वास्को येथील कोळसा प्रदुषणाचा उल्लेख करत भाजपाला मतदान न करण्याचे आवाहन केले होते. भाजप राजवटीत राज्यात प्रदुषण वाढले. ख्रिस्ती लोकांच्या सार्वजनिक सुट्ट्या कापल्या अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपाने त्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.दक्षिण गोव्यातील निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीप्रमाणे, सुरुवातीला एकाच व्हिडिओवर आधारित तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर अशाच प्रकारचे आणखी तीन व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याचे दिसून आल्यानंतर या व्हिडिओंच्या प्रतीही आयोगाला पाठविण्यात आल्या होत्या. त्यानंतर या सर्व प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. फा. डिसिल्वा यांच्या कृतीचा चर्चसंबंधित असलेल्या संघटनांनीही निषेध केला असून चर्चच्या मंचाचा केलेला हा गैरवापर अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

टॅग्स :goaगोवाElectionनिवडणूकBJPभाजपा