आठ पालिकांत सत्तेचे स्वप्न धूसर

By Admin | Updated: October 30, 2015 02:18 IST2015-10-30T02:18:11+5:302015-10-30T02:18:30+5:30

मडगाव : अकरापैकी ८ पालिकांवर भाजपचा झेंडा फडकणार, या मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केलेल्या घोषणेला ४८ तासही उलटलेले नसताना भाजपची ही आशा धूसर होऊ लागली आहे.

The eight political parties have dreamed of power | आठ पालिकांत सत्तेचे स्वप्न धूसर

आठ पालिकांत सत्तेचे स्वप्न धूसर

मडगाव : अकरापैकी ८ पालिकांवर भाजपचा झेंडा फडकणार, या मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केलेल्या
घोषणेला ४८ तासही उलटलेले नसताना भाजपची ही आशा धूसर होऊ लागली आहे. कुंकळ्ळीची पालिका ज्योकिम आलेमाव यांनी भाजपच्या हातातून हिसकावून घेतलेली असतानाच आता काणकोण पालिकाही निसटण्याची चिन्हे आहेत. आपल्या ५ समर्थक नगरसेवकांना घेऊन माजी आमदार विजय पै खोत हे कोल्हापूरला रवाना झाल्याने काणकोण पालिका
कब्जात घेण्याचे भाजपचे प्रयत्न धुळीस मिळण्याची चिन्हे आहेत.
काणकोण पालिकेत ५-५ अशी स्थिती झाल्याने दोन्ही गटांकडून विरोधी गटाचे उमेदवार फोडण्याचे प्रयत्न झाले होते.
अशा परिस्थितीत आपले नगरसेवक फुटू नयेत, यासाठी विजय पै खोत हे दिवाकर पागी, श्यामसुंदर देसाई या दोन नगरसेवकांसह तसेच महिला नगरसेवक
छाया कोमरपंत यांचे पती सोयरू
कोमरपंत, प्रार्थना गावकर यांचे पती रमाकांत गावकर व सुचिता धुरी यांचे वडील
रत्नाकर धुरी यांना घेऊन कोल्हापूरला ठाण मांडून आहेत. हे सर्व नगरसेवक एकत्र असल्याची छायाचित्रेही सोशल मीडियावर प्रसारित झाली आहेत.
अपक्ष उमेदवारांना घेऊन भाजपने कुंकळ्ळीतही नगरमंडळ घडविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ज्योकिम आलेमाव यांनी आपले कडवे विरोधक असलेले मारियो मोराईस यांच्याशीच हातमिळवणी करत भाजपचा डाव उधळून लावला. बुधवारी उशिरापर्यंत आमदार राजन नाईक यांच्या संपर्कात असलेले मोराईस यांना आलेमाव यांनी शेवटच्या क्षणी फोडून आपल्या बाजूने आणले होते. याशिवाय शशांक देसाई या भाजप समर्थक नगरसेवकालाही आपल्या गोटात सामील करून घेतले होते. काँग्रेसचे माजी आमदार ज्योकिम आलेमाव यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे भाजपच्या संपर्कात असलेले आणखी दोन नगरसेवक काँग्रेसला पाठिंबा देणार आहेत.
केपे पालिकेतही भाजपला अपशकुन होण्याची शक्यता आहे. या पालिकेत भाजपच्या उमेदवारीवर निवडून आलेले एकमेव भाजप नगरसेवक मान्युएल कुलासो हेही आमदार बाबू कवळेकर यांच्या गटात सामील होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The eight political parties have dreamed of power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.