खनिज निर्यात कर कपातीसाठी प्रयत्न
By Admin | Updated: October 12, 2015 01:59 IST2015-10-12T01:58:55+5:302015-10-12T01:59:04+5:30
पणजी : दहा टक्के निर्यात कर हा गोव्याच्या खाण उद्योगाला मारक ठरत असून हा कर कमी करण्याच्या संबंधी आपण केंद्राशी चर्चा करणार असल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर

खनिज निर्यात कर कपातीसाठी प्रयत्न
पणजी : दहा टक्के निर्यात कर हा गोव्याच्या खाण उद्योगाला मारक ठरत असून हा कर कमी करण्याच्या संबंधी आपण केंद्राशी चर्चा करणार असल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पणजी येथे रविवारी प्रकट मुलाखतीत सांगितले.
गोव्यातील खाण उद्योगाच्या भवितव्याविषयीच्या प्रश्नावर ते म्हणाले की गोव्याचे लोह खनिज हे कमी ग्रेडचे असल्यामुळे त्याला मोठा दर नाही. तसेच १० टक्के निर्यात कर हा त्यासाठी अडसर ठरत आहे. गोव्यातील खनिज उद्योगाला पोषक वातावरण त्यामुळे तयार झालेले नाही. हा प्रश्न आपण केंद्रात योग्य माध्यमातून मांंडणार आहोत आणि गोव्याची समस्या पटवून देणार आहोत.
यापूर्वीही पर्रीकर यांनी निर्यात कर हा खाण उद्योगाला अडचण ठरत असल्याचे म्हटले होते. खाण उद्योजकांनीही हा कर कमी करण्यासाठी मागणी केली होती. त्यासाठी व्यवस्थित लॉबिंगही केले होते. मागील अर्थसंकल्पात निर्यात कर कमी होणार अशी त्यांची अटकळ होती; परंतु तसा कोणताही निर्णय घेण्यात न आल्यामुळे खाण जगताने (पान २ वर)