शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कार्यक्षमता ठरतेय मंत्री गोविंद गावडेंची ढाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 08:51 IST

क्रीडा व अन्य खात्यांतील प्रगतीमुळे मुख्यमंत्र्यांचीही भूमिका सौम्य

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मंत्री गोविंद गावडे यांनी गेल्या आठवड्यात प्रेरणा दिनी वादाची विधाने केली तरी, त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याचा मार्ग सोपा नाही याची कल्पना भाजप पक्षातील काहीजणांना आली आहे. गावडे यांची विधाने वादाची असली तरी, गावडे हे कार्यक्षम मंत्री ठरले आहेत याची अनेकांना कल्पना आहे. कला अकाद‌मीचा एक विषय जर सोडला तर कला व संस्कृती खात्यात व क्रिडा तसेच आरडीए या खात्यांमध्ये गावडे यांनी आपली कार्यक्षमता दाखवून दिलेली आहे. ते एक कार्यक्षम मंत्री असल्यानेच मुख्यमंत्र्यांनीही त्यांना कायम सांभाळून घेतले अशी चर्चा अन्य मंत्र्यांमध्ये आहे. मुख्यमंत्र्यांचा राग तूर्त मावळला असल्याचे बोलले जात आहे.

कार्यक्षम मंत्री म्हणून गोविंद गावडे यांनी नेहमीच आपली प्रतिमा ठेवली असल्याने त्यांना मंत्रिमंडळातून वगळणे भाजपला जड जात असल्याचे आतापर्यंतचे चित्र आहे. क्रीडामंत्री, कला व संस्कृतीमंत्री आणि ग्रामीण विकास, अशी तीन महत्त्वाची खाती गावडेंकडे आहेत. या तिन्ही खात्यांना समान न्याय देण्याचे काम आतापर्यंत गोविंद गावडे यांनी केले आहे. गावडे हे आपल्या स्वभावामुळेच आतापर्यंत अडचणीत आले आहेत. रोखठोक व काहीसे बेधडक बोलण्यामुळे त्यांची अडचण झाली पण कार्यक्षम क्रीडामंत्री म्हणून गोविंद गावडे ओळखले जातात. त्यांच्याच काळात राज्यातील खेळांसाठी आवश्यक साधनसुविधा विकसित झाल्या. तसेच प्रतिष्ठेची मानण्यात येत असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाचे श्रेय गावडेंनाच जाते. त्यांच्याच कारकिर्दीत जागतिक बीच व्हॉलीबॉल स्पर्धा झाली. त्याचबरोबर १७ वर्षाखालील फिफा महिला फुटबॉल स्पर्धा, अखिल भारत रैंकिंग बॅडमिंटन स्पर्धा यासारख्या अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. 

फुटबॉलला विकसित करण्यासाठी गावडेंनी युरोपमधील बेंफिका क्लबशी देखील चर्चा केली आहे. मोटर स्पोर्टस् राज्यात यावा, या अनुषंगाने काम करणारे गावडे हे बहुतेक पहिलेच क्रीडामंत्री. २०२५-२६ दरम्यान राज्यात खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन व्हावे यासाठी देखील त्यांनी केंद्रीय क्रीडामंत्र्याशी चर्चा करण्यास सुरुवात केली आहे.

मंत्री गोविंद गावडे यांचा एसटी समाजाचे नेते म्हणून नावलौकिक आहे. या सर्वच गोष्टी गावडेंच्या बाजूने असल्याने पक्षश्रेष्ठींसमोर कारवाई करताना मोठा पेच निर्माण होत आहे. मात्र, गावडे यांनी स्वभावाला मुरड घालण्याची गरज समाजातील काही जागरूक घटक करत आहेत.

कलाकारांना दिला सन्मान

धडाडीचे क्रीडामंत्री असण्याबरोबर गोविंद गावडे यांनी कला व संस्कृती खाते व ग्रामीण विकास दोन्ही बऱ्यापैकी सांभाळले. कला अकादमीच्या विषय वगळता इतर आरोप त्यांच्यावर नाहीत. तसेच कला अकादमीचा विषय पाहता हा विषय तांत्रिक असून, त्यांच्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना हा विषय जास्त जवळचा. स्वतः कलाकार असल्याने गावडेंनीच राज्यातील कलाकारांचे दुःख जास्त जाणवले आणि त्याच अनुषंगाने कलाकारांचा जास्त सन्मान व्हावा यासाठी त्यांनी काही नवीन पुरस्कार कला व संस्कृती खात्याअंतर्गत कलाकारांना दिले. ग्रामीण विकास अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना, स्वयंसेवी गटांना, युवा व्यावसायिकांना त्यांनी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देत आर्थिक चालना दिली.

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण