लहरी पावसामुळे दुष्काळाचा धोका
By Admin | Updated: June 17, 2015 01:42 IST2015-06-17T01:42:35+5:302015-06-17T01:42:47+5:30
पणजी : गोव्यात मान्सून दाखल झाल्यापासून आठ दिवसांत किनारी भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे. मात्र, लागवडीखालील क्षेत्र असलेला वाळपई,

लहरी पावसामुळे दुष्काळाचा धोका
पणजी : गोव्यात मान्सून दाखल झाल्यापासून आठ दिवसांत किनारी भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे. मात्र, लागवडीखालील क्षेत्र असलेला वाळपई, सांगे हा पूर्वेकडील पट्टा कमी पर्जन्यमानामुळे कोरडाच राहिला आहे. हे चित्र आणखी काही दिवस असेच राहिले, तर राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
गोव्यात ८ जूनला दाखल झालेला मान्सून जोरदार बरसला असला, तरी तो किनारपट्टी भागातच अधिक प्रमाणात कोसळल्याचे हवामान खात्याच्या नोंदीनुसार स्पष्ट होत आहे. सर्वाधिक पाऊस पणजीत कोसळला. पणजीत १५ जूनपर्यंत १७ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर केपे, वाळपई, सांगे या भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे.
दिलासादायक बाब म्हणजे, काणकोण भागात १४.४ इंच इतकी समाधानकारक वृष्टी झाली आहे. चापोली धरणाला त्यामुळे आवश्यक प्रमाणात पाणी मिळणे शक्य झाले आहे. साळ नदीचा स्रोत असलेल्या सासष्टी भागातही १२.७ इंच पाऊस पडला आहे. मडगावात १५ जूनपर्यंत सरासरी १३ इंच पाऊस पडला. (प्रतिनिधी)