शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

खाण कंपन्यांनी वाहतूक बंद केल्याने 70 मुले शाळेपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 19:52 IST

संस्थेचे सरचिटणीस अशोक श्रीमाली व गोवा शाखेचे सदस्य रविंद्र वेळीप यांनी पत्रकार परिषद घेतली.

पणजी : खनिज खाणी बंद होताच खाण कंपन्यांनी सोनशी, पिसुर्ले व अन्य अनेक परिसरांमधील विद्यार्थ्यांची वाहतूक व्यवस्था बंद केली. यामुळे 70 पेक्षा जास्त मुले सध्या विद्यालयात जाऊ शकत नाही असे माईन्स, मिनरल्स अॅण्ड पिपल ह्या राष्ट्रीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी येथे सांगितले.

संस्थेचे सरचिटणीस अशोक श्रीमाली व गोवा शाखेचे सदस्य रविंद्र वेळीप यांनी पत्रकार परिषद घेतली. खनिज खाणींच्या दुष्परिणामांची झळ ज्यांना बसली, अशा लोकांसाठी सोनशी येथे संस्थेने एक कार्यक्रम घडवून आणला. सोनशीसह त्या परिसरातील विविध गावांतील लोकांनी त्यात भाग घेतला. खनिज खाणी सुरू होत्या, तेव्हा खाण कंपन्यांनी मुलांची शाळेत वाहतूक करण्यासाठी वाहन व्यवस्था केली होती. खाणी बंद होताच ती वाहतूक बंद झाली व आता 70 पेक्षा जास्त मुले विद्यालयात जाण्यापासून वंचित आहेत असे आम्ही सोनशीमधील उपक्रमावेळी आढळून आले असे श्रीमाली व वेळीप यांनी सांगितले. वास्तविक विद्यार्थ्यांना वाहतूक पुरविणे ही सरकारची जबाबदारी आहे. ती खाण कंपन्यांची जबाबदारी नव्हे. त्यामुळे आता तरी सरकारने वाहतुकीची सोय करावी, असे वेळीप म्हणाले.सरकारच्या जिल्हा मिनरल फाऊंडेशनकडे एकूण 186 कोटी रुपयांचा निधी आहे. हा निधी अशा खाण अवलंबितांच्या सोयीसाठी वापरला जावा. सोनशी व परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. त्यासाठीही 186 कोटींचा निधी उपयोगात आणला जावा. यापूर्वी गोवा सरकारने जिल्हा मिनरल फाऊंडेशनमधून 10 कोटी रुपये खर्च केले पण गैरव्यवस्थापन झाले. त्यामुळे त्या पैशांचा लाभ खाणबाधित लोकांर्पयत पोहचला नाही, असे वेळीप म्हणाले. गोव्यात पर्यावरणाची मोठी हानी खनिज खाणींनी केली. आरोग्य सेवा, मलनिस्सारण, पिण्याचे पाणी यासाठी गोवा सरकारने निधी वापरावा व रोजगाराच्या संधीही त्यातून निर्माण कराव्यात. 

सरकारने खनिज खाणी कशा पद्धतीने चाललेल्या लोकांना हव्या आहेत याचे सर्वेक्षण खाणग्रस्त भागांमध्ये जाऊन करावे. महामंडळ स्थापन करून की सहकारी तत्त्वावर की अगोदरच्याच लिजधारकांनी खाणी चालवाव्यात हे लोकांकडून जाणून घेऊन मग सरकारने धोरण ठरवावे, असे वेळीप म्हणाले. देशभरात जिल्हा मिनरल फाऊंडेशनद्वारे एकूण 13 हजार 398 कोटी रुपये गोळा केले गेले. त्यापैकी फक्त 2 हजार 260 कोटी रुपये वापरले गेले. म्हणजेच फक्त 17 टक्के पैसे वापरले. ओरिसामध्ये सर्वाधिक निधी मिनरल फाऊंडेशनद्वारे येतो पण तिथे फक्त 8 टक्के निधी खाणबाधितांसाठी वापरला गेला, असे अशोक श्रीमली यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाSchoolशाळा