पर्यटक बुडाल्यास दृष्टी संस्थेला दंड ठोठावू : बाबू आजगावकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 07:33 PM2019-10-16T19:33:34+5:302019-10-16T19:45:30+5:30

जीवरक्षकांच्या वेतनाच्या किंवा अन्य मागण्यांच्या वादाशी सरकारचा संबंध येत नाही. किनाऱ्यांवर जीवरक्षक बुडू नयेत याची खबरदारी घेण्याची जबाबदारी दृष्टी या जीवरक्षकांच्या कंत्रटदार कंपनीवर आहे.

drushti organization should be fined if tourists sink: Babu Ajgaonkar | पर्यटक बुडाल्यास दृष्टी संस्थेला दंड ठोठावू : बाबू आजगावकर 

पर्यटक बुडाल्यास दृष्टी संस्थेला दंड ठोठावू : बाबू आजगावकर 

Next

पणजी : जीवरक्षकांच्या वेतनाच्या किंवा अन्य मागण्यांच्या वादाशी सरकारचा संबंध येत नाही. किनाऱ्यांवर जीवरक्षक बुडू नयेत याची खबरदारी घेण्याची जबाबदारी दृष्टी या जीवरक्षकांच्या कंत्रटदार कंपनीवर आहे. यापुढे पर्यटक बुडण्याची घटना घडली तर सरकार दृष्टीकडून दंड आकारेल, असे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी बुधवारी येथे सांगितले.

लोकमतशी बोलताना आजगावकर म्हणाले, की सरकारने दृष्टी यंत्रणेला देण्यात आले आहे. जीवरक्षकांची गाऱ्हाणी काहीही असली तरी, तो विषय कंत्रटदार कंपनीच्या अधिकार क्षेत्रत येतो. किनाऱ्यांवर जीवरक्षक ठेवणे हे दृष्टीचे काम आहे. ती यंत्रणा ते काम करत आहे. अनेक पर्यटकांना वाचविलेही जात आहे. तथापि, पर्यटक बुडू लागले तर, यापुढे दृष्टीला दंड ठोठवला जाईल.

काँग्रेस भ्रष्ट पक्ष

दरम्यान, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व प्रवक्ते अलिकडे वारंवार आजगावकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्याविषयी आजगावकर यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसचे आरोप निराधार आहेत. काँग्रेस हा जगातील सर्वात भ्रष्ट पक्ष आहे. त्या पक्षाच्या नेत्यांना बोलण्याचा अधिकारच राहिलेला नाही. अनावश्यक टीका करणारे प्रेस नोट्स काढत राहणो हाच काँग्रेसचा कार्यक्रम सध्या शिल्लक राहिला आहे, असे आजगावकर म्हणाले. 

काँग्रेसची राजवट असताना पर्यटन खाते जसे चालत होते, तसे आता चालत नाही. आता सर्व काही पारदर्शक आहे. निविदा भरताना आम्ही पारदर्शक पद्धतीचा अवलंब करतो. विधानसभेत प्रत्येक गोष्टीवर व्यापक चर्चा झाली आहे. कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप करून काँग्रेसचे नेते निराशा दाखवून देतात. बऱ्याच काळापासून काँग्रेसला सत्तेबाहेर रहावे लागल्याने तुमची निराशा कुणालाही समजू शकते, असे आजगावकर यांनी म्हटले आहे.

Web Title: drushti organization should be fined if tourists sink: Babu Ajgaonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.