शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

गोव्यात काय मरायचे? मद्यधुंद चालक अन् वाढते अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2024 12:25 IST

अत्यंत बेजबाबदारपणे आजचा युवक दुचाक्या चालवतोय. 

गोवा किलर स्टेट झाले आहे काय असे गोव्याबाहेरील पर्यटक अलिकडे विचारतात. होय, गोव्याचे रस्ते सध्या रक्ताने माखले आहेत असेच नमूद करावे लागेल. यात काहीजणांना अतिशयोक्तीही वाटेल, पण तीन दिवसांत सात बळी जातात हे भयावहच आहे. अगदी कोवळ्या वयातील मुलांचे रक्त रस्त्यावर सांडत आहे. यावर्षी जानेवारी ते १६ सप्टेंबरपर्यंत दोनशे व्यक्तींचे बळी रस्ता अपघातात गेले आहेत. यात अनेक युवक आहेत. एकोणीस ते चाळीस वयोगटातील युवा-युवती रस्त्यावर मरत आहेत. कधी ट्रक चालक, बस चालक किंवा चारचाकी कारसारख्या वाहन चालकांचा दोष असतो, तर कधी दुचाकी चालकच पूर्ण दोषी असतात. अत्यंत बेजबाबदारपणे आजचा युवक दुचाक्या चालवतोय. 

पणजी, दोनापावल, मिरामार, गोवा विद्यापीठ रस्ता, करंजाळे या भागात जाऊन पाहा किंवा मडगाव, फोंडा, डिचोली, मडगाव, वास्को या शहरांना भेट देऊन अभ्यास करा. दुचाकी चालक सुसाट वेगाने जातात. कुठून चार चाकी येतेय किंवा कुठून ट्रक येतोय ते पाहात नाहीत. जिथे छोटी वाट आहे, तिथून घुसण्याचा प्रयत्न करतात. सरकारी यंत्रणा सध्या हप्ते गोळा करण्याच्या कामात बिझी आहे. ते फक्त गोव्याबाहेरील वाहनांना थांबवायचे, महाराष्ट्रातील ट्रकांना अडवायचे किंवा पर्यटकांना छळायचे एवढेच काम करतात. गोवा वाढते वाहन अपघात व वादग्रस्त पोलिसांमुळे बदनाम होत आहे. 

वाहन अपघात रोखण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वारंवार वाहतूक पोलिस, आरटीओ, बांधकाम खाते यांच्या बैठका घ्यायला हव्यात. मात्र मुख्यमंत्री तसे करताना दिसत नाहीत. विद्यमान सरकारमधील अधिकाधिक मंत्री आणि मुख्यमंत्रीदेखील देव दर्शनासाठी जास्त वेळ देत आहेत. धार्मिक विधीतच जास्त वेळ जात आहे.

गोव्यात महामार्ग बांधले गेले. काही रस्ते सहा पदरी तर काही आठपदरी केले गेले. उड्डाण पूल झाले. बायपासची व्यवस्था केली, पण वाहन चालकांमध्ये शिस्त आलेली नाही. जिथे वाहतूक पोलिस किंवा आरटीओ असायला हवेत तिथे ते नसतातच. पणजीत अटल सेतूवरून दुचाकी नेऊ नये हे पर्यटकांना कळत नाही. त्यांना ते कळावे म्हणून पर्वरीच्याबाजूने पोलिसांनी उभे राहून त्यांना योग्य रस्ता दाखवायला हवा. मात्र पोलिस उभे राहतात मेरशीच्या बाजूने. तुम्ही तिसऱ्या पुलावरून दुचाकीने येण्याचा गुन्हा करा, मग आम्ही तुम्हाला अडवून तालांव देतो, अशा पराक्रमी थाटात पोलिस उभे असतात. बिचारे पर्यटक आपल्या बायको-मुलांसह रणरणत्या उन्हात तालांव भरताना रोज दिसतात. मुख्यमंत्री सावंत किंवा वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो किंवा डीजीपी वगैरेंना हे चित्र दिसत नाही काय? हा पर्यटकांचा छळ का म्हणून केला जातो? पर्यटकांना तालांव देण्यातच शक्ती वाया घालवणाऱ्या गोवा पोलिसांनी जिथे वाहतूक कोंडी होते किंवा जी अपघातप्रवण स्थळे आहेत, तिथे उभे राहणे गरजेचे आहे. पेडणे तालुका तर अॅक्सिडंट हब झाला आहे. तेथील महामार्गावरील धोकादायक वळणांनी व अन्य जागांनी अनेकांचे बळी घेतले आहेत. रस्त्यांवर खड्डे असले तरी माणसे मरतात आणि रस्ते रुंद व दुरुस्त झाले तरी अपघात घडतात.

दारू पिऊन वाहन चालवणारे गोव्यात कमी नाहीत. सायंकाळनंतर तर काही मार्गावर वाहन चालविणे धोकादायकच. आई वडील तरुण मुलाला आधुनिक पद्धतीची दुचाकी घेऊन देतात. ही मुलं वाट्टेल तशी दुचाकी उडवतात. अल्कोमीटरने वाहन चालकांची तपासणी करण्याचे काम सरकारी यंत्रणेने पुन्हा बंद केले आहे. रस्त्यांवरील वळणे कापणे किंवा धोकादायक पद्धतीने उभे असलेले वीजखांब अन्यत्र हलविणे हे काम यंत्रणा करत नाही. सरकारला फक्त कोट्यवधींच्या उधळपट्टीचे सोहळे करण्यात रस आहे. गेल्या साडेआठ महिन्यांत एकूण १ हजार ८०० वाहन अपघात झाले आहेत. १९० अपघात भीषण आहेत. कुणी अपंग झाले तर कुणी कायमचे जीवास मुकले. प्रत्येक तीन दिवसांत हेल्मेट नसलेला एक दुचाकी चालक गोव्यात ठार होतोय ही सरकारी आकडेवारी आहे. २०२१ ते २०२३ पर्यंत साडेतीनशे दुचाकीस्वार प्राणास मुकले, ज्यांनी हेल्मेट घातले नव्हते. गोवा किलर स्टेट नाही, हे दाखवून देण्यासाठी सरकारलाच आता कडक उपाययोजना करावी लागेल.

 

टॅग्स :goaगोवाAccidentअपघातPoliceपोलिस