शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांनो जरा जपून! 1 मार्चपासून गोव्यात उघडयावर दारू प्यायल्यास तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 17:45 IST

पर्यटकांना गोव्यात येऊन जीवाचा गोवा करायचा असेल तर अवश्य करा. मात्र सार्वजनिक जागेवर किंवा बीचवर दारू पिण्याचे टाळा. 1 मार्चनंतर गोव्यात उघडयावर दारू प्यायल्यास तुरुंगात

सुशांत कुंकळयेकर

मडगाव :  पर्यटकांना गोव्यात येऊन जीवाचा गोवा करायचा असेल तर अवश्य करा. मात्र सार्वजनिक जागेवर किंवा बीचवर दारू पिण्याचे टाळा. 1 मार्चनंतर गोव्यात उघडय़ावर दारू प्यायल्यास तुमच्यावर तुरुंगात जाण्याची पाळी येऊ शकेल हे जरा ध्यानात ठेवा. मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी बुधवारी मडगावात झालेल्या एका कार्यक्रमात ही माहिती दिली. गोव्यात विशेषत: समुद्र किना-यावर दारु पिऊन बाटल्या किना-यावरच फेकून देण्यात येतात. त्यामुळे कच-याची समस्या तर वाढतेच शिवाय हा कचरा पर्यावरणालाही घातक ठरतो. त्यामुळे सार्वजनिक जागेवर दारु पिण्यास बंदी आणण्याचा कायदा मार्चर्पयत गोव्यात लागू होणार असून अशाप्रकारे दारु पिणारे आढळल्यास त्यांच्यावर दंडनीय कारवाई केली जाईल असे ते म्हणाले.गोवा 2 ऑक्टोबर्पयत हागणदारी मुक्त करण्याची मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात पुन्हा एकदा घोषणा केली असून सध्या गोव्यात 72 हजार घरांना शौचालये नाहीत ही वस्तुस्थिती असल्याचे सांगितले. त्याशिवाय राज्याला याबाबतीत स्थलांतरीत कामगारांची समस्या सतावते. या परिस्थितीवर तत्काळ उपाय काढण्याची गरज असून ही शौचालये उभारण्यासाठी राज्य सरकार 300 कोटी रुपये खर्च करणार असे त्यांनी सांगितले.मडगावात स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमाखाली मुख्यमंत्र्यांनी बुधवारी दक्षिण गोव्यातील पंचायत सदस्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, गोव्यात कित्येक ठिकाणी कामगारांना  भाडय़ाने खोल्या देतात, मात्र या भाडेकरुंसाठी शौचालयांची सोय नसते. यामुळे आता पंचायत कायद्यातही बदल केला जाणार आहे. जे जमीन मालक आपल्या खोल्या भाडय़ाने देतात त्यांना शौचालयाचीही सोय करणे अनिवार्य असून जर ती सोय केली नाही तर अशा घर मालकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असे ते म्हणाले.गोव्यात कच-यावर प्रक्रिया करणारे एकूण चार प्रकल्प उभारले जाणार असून या प्रकल्पांतून तयार होणा-या बायो गॅसवर सार्वजनिक बसेस चालविल्या जाणार आहेत. या चार प्रकल्पांतून तयार होणा-या बायो गॅसवर गोव्यातील एक तृतीयांश सार्वजनिक वाहने चालू शकतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :goaगोवाliquor banदारूबंदी