मद्यप्राशनावर भर
By Admin | Updated: November 13, 2015 02:13 IST2015-11-13T02:13:08+5:302015-11-13T02:13:21+5:30
पणजी : ज्या रात्री फा. बिस्मार्क नदीत पोहण्यासाठी गेले होते, त्या दिवशी ते दिवसभर कोठे होते व त्यांनी

मद्यप्राशनावर भर
पणजी : ज्या रात्री फा. बिस्मार्क नदीत पोहण्यासाठी गेले होते, त्या दिवशी ते दिवसभर कोठे होते व त्यांनी
काय केले याविषयीचा तपशीलवार अहवाल पोलीस खात्याने मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना सादर केला आहे. या अहवालात पोलिसांनी बिस्मार्कच्या मद्यप्राशनावर भर दिलेला आहे.
आपल्याला फा. बिस्मार्कच्या मृत्यूविषयी अगोदर प्राथमिक अहवाल तरी सादर
करा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना गेल्या आठवड्यात केली होती. त्यानुसार गुरुवारी मुख्यमंत्र्यांना अहवाल मिळाला. फा. बिस्मार्क सायंकाळनंतर नदीवर गेले होते. तत्पूर्वी दिवसभर ते कुठे होते व त्यांनी काय काय केले, याविषयीची माहिती पोलिसांनी गोळा केली. त्यावर आधारित अहवालात मद्यप्राशनाचा स्पष्ट उल्लेख
आहे, असे सूत्रांनी सांगितले.
फा. बिस्मार्क दोन युवकांसोबत सांतइस्तेव्ह बांधालगतच्या नदीवर गेले
होते. ते पोहण्यासाठी नदीत उतरले व मग बाहेरच आले नाहीत. तथापि, नदीत उतरण्यापूर्वी दिवसभर ते कोणत्या स्थितीत होते, याची माहिती पोलिसांनी मिळवली आहे. फा. बिस्मार्क यांनी त्या दिवशी मद्यप्राशन केले होते, अशी माहिती पोलिसांकडून मुख्यमंत्र्यांना अहवालाद्वारे दिलेली आहे. फा. बिस्मार्क यांचा सामाजिक चळवळींमध्ये समावेश होता, हे लक्षात घेऊन बिस्मार्क यांच्या मृत्यूप्रकरणी खोलात जाऊन चौकशी करण्याची सूचना पोलिसांना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. हे प्रकरण चौकशीसाठी क्राईम ब्रँचकडे सोपविण्याचा निर्णय सध्या तरी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला नाही; पण व्हिसेरा अहवाल आल्यानंतर पुढे कोणती भूमिका घ्यावी ते सरकार ठरवणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. (खास प्रतिनिधी)