दाम्पत्याच्या भांडणात नावेलीत पत्नीचा मृत्यू

By Admin | Updated: April 15, 2016 02:13 IST2016-04-15T02:11:48+5:302016-04-15T02:13:08+5:30

मडगाव : पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण होऊन त्यात पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डोंगरी-नावेली येथे घडली.

Dove wife dies in a dispute between a couple | दाम्पत्याच्या भांडणात नावेलीत पत्नीचा मृत्यू

दाम्पत्याच्या भांडणात नावेलीत पत्नीचा मृत्यू

मडगाव : पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण होऊन त्यात पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डोंगरी-नावेली येथे घडली. चंद्रकला मेहता (६२) असे या महिलेचे नाव असून, खून म्हणून मडगाव पोलिसांनी हे प्रकरण नोंदवले आहे. चंद्रकला यांचे पती मोहन मेहता (७१) हा संशयित असून, सध्या तो फरार आहे.
उभयतांमध्ये गेली अनेक वर्षे वितुष्ट होते. एकाच फ्लॅटमध्ये हे जोडपे वेगवेगळे राहात होते. त्यांच्यात वारंवार खटके उडत. पोलीस ठाण्यापर्यंत अनेकदा त्यांची भांडणे पोहोचली होती. गुरुवारी दुपारी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण होऊन जीवाच्या आकांताने चंद्रकला यांनी पहिल्या मजल्यावरील आपल्या फ्लॅटमधील बाथरुमच्या खिडकीतून जीव वाचविण्यासाठी उडी मारली. मात्र, उंचावरून जमिनीवर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी आढळून आलेल्या प्रथमदर्शनी पुराव्यानुसार हा खुनाचाच प्रकार असल्याचे आढळल्यामुळे पोलिसांनी भादंसंच्या ३0२ कलमाखाली ही घटना नोंदवली आहे. पोलीस निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत. मेहता कुटुंबीय मूळचे कारवार येथील असून, संशयित मोहन हा पूर्वी अकाऊंटंट म्हणून काम करत होता.

Web Title: Dove wife dies in a dispute between a couple