शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री तंदुरुस्त, काँग्रेसनं चिंता करु नये; भाजपाचा काँग्रेसला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 21:26 IST

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या विधानाचा भाजपाकडून समाचार

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे पूर्ण तंदुरुस्त असून त्यांनी प्रशासनावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे काँग्रेसने मुख्यमंत्र्यांची चिंता करु नये, असे भाजपाचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी म्हटले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मुख्यमंत्र्यांना आरोग्यविषयक सल्ले देऊ नयेत, असंही तानावडे म्हणाले. त्यांनी माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. पर्रिकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या आणि तब्येतीची काळजी घ्यावी, असे चोडणकर म्हणाले होते. चोडणकर यांच्या या विधानाचा आम्ही निषेध करतो, असे तानावडे म्हणाले. मुख्यमंत्र्यांना सल्ला देणारे चोडणकर हे कोण असा प्रश्न विचारून तानावडे म्हणाले, की मुख्यमंत्री सक्षम असून सरकारही पूर्णपणे स्थिर आहे. मुख्यमंत्री जेव्हा अमेरिकेहून गोव्यात परतले, तेव्हा काँग्रेसचे काही आमदार व्यक्तीश: जाऊन पर्रिकर यांना भेटले. तुम्ही आला हे बरे झाले व पूर्वीप्रमाणे तुम्ही राज्याचा कारभार पुढे न्यावा, असे काँग्रेसच्या आमदारांनी पर्रिकर यांना सांगितले. गिरीश चोडणकर यांना हे ठाऊक नाही, त्यांनी त्याविषयी माहिती करून घ्यावी, असा सल्ला तानावडे यांनी चोडणकर यांना दिला.तानावडे म्हणाले, की चोडणकर हे युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना अपरिपक्व वागत होते. आता ते प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांनी अपरिपक्व विधाने करू नयेत. पर्रिकर अमेरिकेहून परतल्याने चोडणकर व काँग्रेसमधील त्यांच्या अन्य काही साथीदारांचे धाबे दणाणले आहे. त्यांनी स्वत:चे सोळा आमदारच एकत्र ठेवण्यावर लक्ष केंद्रीत करावे. चोडणकर किंवा त्यांचे कोणतेच साथीदार कधी सरपंच, पंच व आमदार झालेले नाहीत, असंही तानावडे यांनी म्हटलं. 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाBJPभाजपाcongressकाँग्रेस