शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
3
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
5
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
6
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
7
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
8
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
9
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
10
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
11
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
12
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
14
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
15
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
16
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
17
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
18
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
19
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?

‘मगो’ला सरकारमधून हटवणार नाही!

By admin | Updated: January 20, 2015 02:14 IST

पणजी : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला सरकारमधून हटविण्याचा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व अन्य ज्येष्ठ भाजप नेते मुळीच विचार करत नाहीत, हे सोमवारी स्पष्ट झाले.

पणजी : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला सरकारमधून हटविण्याचा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व अन्य ज्येष्ठ भाजप नेते मुळीच विचार करत नाहीत, हे सोमवारी स्पष्ट झाले. भाजपच्या सर्व मंत्री, आमदारांची व निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक कळंगुट येथील एका हॉटेलमध्ये सोमवारी रात्री सुरू झाली. मात्र आमदार विष्णू वाघ बैठकीत सहभागी झाले नाहीत. तसेच उद्योगमंत्री महादेव नाईक दिल्लीत असल्याने तेही बैठकीत भाग घेऊ शकले नाहीत. सरकारची प्रगती कशी काय आहे, विविध मंत्र्यांकडून भाजपच्या आमदारांची कामे केली जातात की नाही, विविध योजनांबाबत लोक खुश आहेत की नाही याविषयी बैठकीत ढोबळ मानाने चर्चा झाली. काही आमदारांनी आपली मते मांडली. जिल्हा पंचायत निवडणूक पक्षीय पातळीवर होणार असल्याने त्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. पार्सेकर मुख्यमंत्री बनल्यानंतर प्रथमच अशा स्वरूपाची बैठक सुरू झाली असून ती आज संपुष्टात येईल. चिंतन बैठक तथा श्रम परिहार, असेही बैठकीचे स्वरूप आहे. पाच वर्षांसाठी युतीस कौल माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी म.गो. पक्षाच्या नेत्यांशी चांगले संबंध ठेवले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत २०१२ च्या निवडणुकीवेळी भाजप व मगोची युती झाली होती. ही युती पाच वर्षांसाठी होती. लोकांनी मगो-भाजप युतीला पाच वर्षांसाठी कौल दिलेला असल्याने आता युती तोडायचा भाजपचे नेते विचार करत नाहीत, असे संकेत काही मंत्र्यांकडून मिळाले. युतीविरुद्ध फक्त एक-दोन आमदारच बोलत आहेत. युती तोडून पुढे जाणे हे थोडे अवघड ठरेल, असे मत काही भाजप नेते व्यक्त करत आहेत. (खास प्रतिनिधी)