शहरं
Join us  
Trending Stories
1
पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच भाजपाने तीन ठिकाणी उधळला गुलाल
2
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
3
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
4
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
5
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
6
सावधान! ChatGPT वर तुमची माहिती गुप्तपणे सेव्ह होते; टाळायचे असेल तर या ५ स्टेप्स फॉलो करा
7
अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
8
VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी 'संकटमोचक' ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल
9
झटपट, पटापट! स्मार्टफोन, इंटरनेट नसेल तरी नो टेन्शन; 'हा' नंबर डायल, काही सेकंदात UPI पेमेंट
10
“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
11
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
12
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
13
Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
14
'ताज'चे नाव आता 'जीव्हीके' हॉटेल्सवरून हटणार; टाटा समुहाने संपूर्ण हिस्सा विकला, कोण आहे खरेदीदार?
15
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
16
जिभेचे चोचले की निसर्गाचा चमत्कार? जगातला असा एकमेव बेट, जिथे चक्क माती खातात लोक!
17
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
18
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
19
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
20
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
Daily Top 2Weekly Top 5

लुथरा बंधूंना सोडू नका, आम्हाला लवकर न्याय द्या; मृतांच्या कुटुंबीयांकडून निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 07:49 IST

हडफडे सरपंच, सचिवाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : हडफडे येथील बर्च रोमिओ आगी प्रकरणात म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने हडफडे ग्रामपंचायतीचे सरपंच रोशन रेडकर आणि पंचायत सचिव रघुवीर बागकर यांना अटकपूर्व जामीन नाकारला आहे. प्रथम वर्ग न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर दोघांनी या निर्णयाला अतिरिक्त सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. दरम्यान, न्यायालयात सुनावणी दरम्यान घटनेत बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांनी जलद गतीने न्याय देण्याची मागणी केली.

या प्रकरणात दोघेही चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत. बागकर यांना सेवेतून निलंबीतही करण्यात आले आहे. त्यानंतर दोघांनीही संभाव्य अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले होते. न्यायालयाने या प्रकरणातील आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याचे नमूद केले. परवाने, अग्निसुरक्षा आणि नियम पालनाबाबत चौकशी आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. आरोपींची कोठडीतील चौकशी गरजेची ठरू शकते, असेही निरीक्षण नोंदवण्यात आले.

सरकार पक्षाने अटकपूर्व जामीनाला विरोध केला. ग्रामपंचायत स्तरावर देखरेख व अंमलबजावणीतील त्रुटींमुळे ही दुर्घटना घडल्याचा युक्तिवाद करण्यात आला. जामीन दिल्यास तपासात अडथळे येण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले. या आगीत जीवितहानी झाली असून नियमांचे उल्लंघन आणि परवान्यांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अटकपूर्व जामीन फेटाळल्याने तपास यंत्रणांना पुढील कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लुथरा बंधुंना सुनावणीपर्यंत दिलासा

क्लबचे मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा हे दोघे पोलिस कोठडीत आहेत. वरील बनावट दाखल्याप्रकरणात त्यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी ७ रोजी होणार आहे. सुनावणीपर्यंत त्यांना या प्रकरणात दिलासा देण्यात आला आहे.

लुथर बंधूंना मोकळे सोडू नका : मृतांच्या कुटुंबीयांची मागणी

न्यायालयात सुनावणी दरम्यान घटनेत बळी पडलेल्यांच्या नातलगांनी तसेच परिवारातील सदस्य न्यायालयाच्या परिसरात उपस्थित होते. सरकारने या प्रकरणाची सुनावणी जलद गतीने करावी तसेच आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून घ्यावा, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची संधी घ्यावी, असेही सांगण्यात आले. लुथरा बंधूंना मोकळे सोडू नका, बाहेर सोडल्यास ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, ते काहीही करू शकतात अशी भीती मृतांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. झारखंड, दिल्ली तसेच इतर भागातून हे नातलग आले होते. या घटनेला लुथरा बंधूच जबाबदार असल्याचा आरोप या कुटुंबीयांनी केला.

'बर्च' दुर्घटना सुरक्षात्मक निर्बंध उल्लंघनामुळेच

हडफडे येथील रोमिओ लेनमधील 'बर्च' नाईट क्लबमध्ये डिसेंबरमध्ये घडलेली भीषण आग ही अपघात नसून सुरक्षात्मक नियमांच्या सर्रास उल्लंघनामुळे झालेली टाळता येण्याजोगी दुर्घटना असल्याचे मत उच्च न्यायालयाने स्वतःहून दाखल केलेल्या जनहित याचिकेत नियुक्त अमिकस क्युरी अॅड. रोहित ब्रास डिसा यांनी मांडले आहे. या दुर्लघटनेत २५ जणांचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणात न्यायालयात सादर केलेल्या स्मरणपत्रात अॅड. डिसा यांनी इमारत, अग्निसुरक्षा, सीआरझेड तसेच व्यापार परवाना नियमांचे पालन न होणे आणि अंमलबजावणीत झालेली ढिलाई ही या दुर्घटनेमागील प्रमुख कारणे असल्याचे स्पष्ट केले. उच्च-जोखमीच्या किनारी भागातील नाईट क्लब व मनोरंजनस्थळांवर लक्ष ठेवण्यासाठी बहुउद्देशी कृतिदल स्थापन करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. पंचायत, नगरपालिका आणि संबंधित यंत्रणांची संमती नसल्यास कोणताही व्यापार किंवा आतिथ्य परवाना देऊ नये किंवा नूतनीकरण करू नये, असे निर्देश देण्याची मागणीही करण्यात आली.

कारवाईला स्थगिती म्हणजे कामासाठी परवाने नव्हे

कोणताही वैधानिक परवाना कालबाह्य, निलंबित किंवा रद्द झाल्यास संबंधित व्यापार परवाना आपोआप निलंबित व्हावा, अशी शिफारसही त्यांनी केली. बांधकाम पाडण्याच्या आदेशाला अपीलमध्ये स्थगिती मिळाली म्हणून त्याला इतर परवाने प्राप्त होत नाहीत. त्यामुळे आस्थापन चालू ठेवू शकत नाही यासाठी न्यायालयाने विशेष निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.

विशेष ऑडिट व्हावे

राज्याच्या संपूर्ण किनारपट्टीवरील उच्च-जोखमीच्या आस्थापनांचे विशेष ऑडिट करून नियमांचे पालन होत आहे की नाही याची तपासणी करण्याची सूचना देण्यात आली आहे. बर्च प्रकरणात परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचाही प्रस्ताव अमिकस क्युरी यांनी मांडला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Don't release Luthra brothers; give us justice, demand victims' families.

Web Summary : Families of victims in the Birch Romeo fire case protested, demanding swift justice and opposing the release of the Luthra brothers. The court denied pre-arrest bail to two officials. A high court report cited safety violations as the cause of the deadly fire.
टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारीPoliticsराजकारण