शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

आजचा अग्रलेख: वेलिंगकरांकडून मर्मभेद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 08:20 IST

एखादे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर जर वाचकांचे कुतूहल जागे होत असेल व पुस्तक चर्चेचा विषय ठरत असेल तर ते लेखकाचे यश ठरते.

एखादे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर जर वाचकांचे कुतूहल जागे होत असेल व पुस्तक चर्चेचा विषय ठरत असेल तर ते लेखकाचे यश ठरते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्यातील माजी संघचालक सुभाष वेलिंगकर यांनी 'लोटांगण' हे पुस्तक रविवारी प्रकाशित केले. पुस्तकाविषयी सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. हे पुस्तक म्हणजे कथा, कादंबरी किंवा कविता संग्रह नव्हे. 'लोटांगण' म्हणजे देशातील एका मोठ्या आणि अत्यंत शिस्तबद्ध संघटनेत पडलेल्या फुटीचा इतिहास आहे. भाजपसमोर संघाने नांगी टाकल्यामुळे ओढवलेल्या कटूस्थितीचा आढावा आहे. गोव्यात साठ वर्षे काम केल्यानंतर संघात मध्यंतरी जी उभी फूट पडली, त्या फुटीची पार्श्वभूमी आणि भाजप व मनोहर पर्रीकर यांची भूमिका याची चिकित्सा पुस्तकात आहे. पुढील अनेक पिढ्यांना संदर्भग्रंथ म्हणून 'लोटांगण' उपयोगी ठरणार आहे. 

संघाचे भविष्यातील स्वयंसेवक आणि भावी पिढ्यांतील शिक्षणतज्ज्ञ यांच्यासाठीही अभ्यासाचा विषय म्हणून 'लोटांगण' कायम जिवंत राहील. मातृभाषेच्या विषयावरून संघ कसा फुटला, त्यामागे भाजपची कूटनीती कशी कारण ठरली आणि पर्रीकर यांचे नेमके कुठे चुकले हे समजून घ्यायचे असेल तर 'लोटांगण' वाचल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. गोवा व महाराष्ट्रात दरवर्षी हजारो पुस्तके प्रकाशित होतात. काही कपाटातच तर काही विद्यापीठांच्या ग्रंथालयांची शोभा वाढवतात. काही वाळवीच्या भक्ष्यस्थानी पडतात तर काही पुस्तके वाचकच नसल्याने आत्महत्या करतात. मात्र, ऐतिहासिक संदर्भ असलेली, तात्त्विक लढ्याचा इतिहास मांडणारी पुस्तके कायम डोळ्यांखाली असली, तर निदान भविष्यातील राजकीय नेत्यांना तरी मातृभाषेसारख्या विषयाशी खेळ मांडायचा नसतो,याची जाणीव होईल.

चर्च संस्थेशी निगडीत इंग्रजी शाळांना माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने अनुदान सुरू केले होते. त्या विरोधातील आंदोलनात स्वर्गीय शशिकला काकोडकर, सुभाष वेलिंगकर, रत्नाकर लेले, उदय भेंब्रे, पुंडलिक नाईक, अरविंद भाटीकर आदी उतरले तेव्हा कामत सरकारवर ताण आला होता. भाजपने मातृभाषा रक्षणाचा आव आणत त्यावेळी आपलीही शक्ती आंदोलनात उतरवली. इंग्रजी शाळांना अनुदान देण्याचा कामत सरकारचा निर्णय योग्य होता की अयोग्य हा वेगळा प्रश्न, पण अनुदान दिल्याने गोव्याच्या पुढील पिढ्या बरबाद होतील, अशी भाषणे त्यावेळचे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर करत होते. सांस्कृतिकदृष्ट्या गोवा संपून जाईल, अशा अर्थाची विधाने पर्रीकर करायचे. पुढे २०१२ साली सत्ता परिवर्तन होऊन पर्रीकर मुख्यमंत्री झाले. 

आता भाजप सरकार निश्चितच इंग्रजी शाळांचे सरकारी अनुदान बंद करेल, असे भाषा सुरक्षा मंचला वाटले. मात्र, पर्रीकर यांनी अनुदान बंद केले नाही. अनुदान बंद केल्यास कदाचित भाजप सरकार कोसळले असते किंवा ख्रिस्ती आमदारांनी बंड करून पर्रीकरांना अडचणीत आणले असते. हा मुद्दादेखील समजता येतो. मात्र, गोव्यातील भाजपवाले आणि काही केंद्रीय भाजप नेत्यांनी मिळून वेलिंगकर यांनाच संघचालक पदावरून दूर करण्यात यश मिळवले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी यात पूर्णपणे भाजपच्या नेतृत्वाला साथ दिली व वेलिंगकर यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. म्हणजे मातृभाषेच्या विषयावरून आंदोलन उभे केलेले गोव्यातील संघाचे नेतृत्वच भाजपच्या हितासाठी वरिष्ठ संघ नेत्यांनी संपुष्टात आणले. परिणामी संघात मोठी फूट पडली. 

आजदेखील गोव्यात संघाची दोन मोठी शकले दिसून येतात. वेलिंगकर यांनी हे सारे 'लोटांगण मध्ये मांडले आहे. वास्तविक वेलिंगकर यांना आंदोलनाशी प्रतारणा करून आपले संघचालकपद टिकवता आले असते. 'लोटांगण' पुस्तकाचे वैचारिक मूल्य वाढले आहे. 'जसे बोलतो, तसे करतो,' असे माध्यमप्रश्नी तरी वेलिंगकर यांचे आचरण राहिले आहे. यामुळे 'लोटांगण'चे पावित्र्य वाढले. प्राथमिक शिक्षण माध्यम हा विषय आता गोव्यात डेड इश्यू झाला आहे. पर्रीकर हयात नसल्याने वेलिंगकर यांनी नव्याने त्यांच्यावर टीका करण्यात अर्थ नाही. तरीदेखील पुस्तकाच्या रूपात इतिहास कोरून ठेवण्याचे वेलिंगकर यांनी केलेले काम ही काळाची गरज होती, हे नमूद करावे लागेल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघManohar Parrikarमनोहर पर्रीकर