फोंडा तालुक्यात खंडित वीज

By Admin | Updated: May 7, 2016 02:52 IST2016-05-07T02:46:23+5:302016-05-07T02:52:54+5:30

फोंडा : फोंडा वीज खात्याला वीज वाहिन्यांवर पावसाळापूर्व दुरुस्ती काम करावयाचे असल्याने तसेच वाहिन्यांवरील झाडे तोडणे,

Disrupted power in Fonda taluka | फोंडा तालुक्यात खंडित वीज

फोंडा तालुक्यात खंडित वीज

फोंडा : फोंडा वीज खात्याला वीज वाहिन्यांवर पावसाळापूर्व दुरुस्ती काम करावयाचे असल्याने तसेच वाहिन्यांवरील झाडे तोडणे, एबी स्वीच दुरुस्ती व ट्रान्स्फॉर्मरचे दुरुस्तीकाम करावयाचे असल्याने पुढील दिवशी सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत वीजपुरवठा होणार नाही, असे कळविण्यात आले आहे. दि. १0 मे रोजी बोंडला फिडरवरील गावकरवाडा, गांजे, नानुस, बोंडला, कल्लपवाडा, पोल्ट्री वर्ल्ड. दि. ११ मे रोजी ओपा फिडरवरील ओपा, ओपावाडा, कोडार, देऊळवाडा, गावकरवाडा आणि शिरंताळ. दि. १२ रोजी सोनारबाग फिडरवरील तिस्को व्हॅली, धाटवाडा, पार, कडसाळ, खांडेपार. दि. १३ रोजी उसगाव फिडरवरील मुर्डी, गावठण, नालारकोंड, पंचमी. दि. १४ रोजी बोंडला फिडरवरील उसगाव, नानूस, गांजे, कल्पावाडा, ताकवाडा, तिराळ. दि. १५ रोजी बोंडला फिडरवरील पालवाडा, साईनगर, धावशिरे. दि.१७ रोजी बोंडला फिडरवरील तिस्को, प्रतापनगर, पणसुले. दि. १८ रोजी बोंडला फिडरवरील खांडेपार, मुर्डी, केरये, नार्लाकोंड, पंचमी या भागात वीजपुरवठा होणार नाही, असे वीज खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.

Web Title: Disrupted power in Fonda taluka