गोव्याची दिशा बनली क्रॅश फायर टेंडर चालवणारी देशातील पहिली महिला फायरफाईटर
By पूजा प्रभूगावकर | Updated: November 28, 2023 18:26 IST2023-11-28T18:25:59+5:302023-11-28T18:26:42+5:30
मोपा विमानतळ येथे कार्यरत

गोव्याची दिशा बनली क्रॅश फायर टेंडर चालवणारी देशातील पहिली महिला फायरफाईटर
पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे कार्यरत असलेली गोव्याची दिशा नाईक ही क्रॅश फायर टेंडर चालवणारी देशातील पहिली महिला फायरफाईटर ठरली आहे.
या यशासाठी तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. मोपा विमानतळावरील एरोड्रोम रेस्क्यु ॲण्ड फायरफाईटींग युनिटमध्ये ती कार्यरत आहेत. लिंगभेदाला छेद देऊन ती तिने आपल्या अथक परिश्रमाच्या आधारे तसेच घेतलेल्या प्रशिक्षणाव्दारे ती क्रॅश फायर टेंडर चालवणारी देशातील पहिली महिला फायरफाईटर ठरली आहे.
दिशा हिने मोपा विमानतळ येथे नोव्हेंबर २०२१ मध्ये एरोड्रोम रेस्क्यु ॲण्ड फायरफाईटींग युनिटमध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता. प्रशिक्षणानंतर ती या युनिटमध्ये १ जुलै २०२२ रोजी रुजू झाली. त्यानंतर तिने क्रॅश फायर टेंडर चालवण्याची इच्छा व्यक्त केली. इतक्यावरच ती थांबली नाही, तर तिने तमिळनाडू येथे त्यासाठीचे सहा महिन्यांचे प्रशिक्षणही घेतली. तिच हा प्रवास बराच आवाहनात्मक होता. मात्र त्यात तिने यश संपादीत केले. त्यानुसार दिशा ही क्रॅश फायर टेंडर चालवणारी देशातील पहिली प्रमाणित महिला फायरफाईटर बनली आहे.